शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘जान्दू’ नंतर ‘मॉन्टे कार्लो’वर प्रशासन मेहरबान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 16:27 IST

Khamgaon News महसूल प्रशासनाकडून याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: रस्ता विस्तारीकरणासाठी गौण खनिज अवैध उत्खननासाठी कंत्राटदार कंपन्यांना महसूल प्रशासनाकडून झुकते माप दिले जात असल्याचे दिसून येते. ‘जान्दू’नंतर ‘मॉन्टे कार्लो’ कंपनीकडून खामगाव तालुक्यात अवैध उत्खनन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी टेंभूर्णा येथील तलाठी आणि मंडळ अधिकाºयांचा संयुक्त चौकशी अहवाल दुर्लक्षीत असल्याची धक्कादायक बाब उघड होत आहे.राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करणाºया ‘मॉन्टे कार्लो’ लिमिटेडकडून टेेंंभूर्णा शिवारातील गट नं ११४ आणि ११५ मध्ये उत्खनन करण्यात आले. उत्खनन करताना मोजणी आणि सीमांकन करून कामास सुरूवात करण्यात आलेली नाही. तसेच ३ मीटर खोलीपेक्षा खोदकाम केल्याची गंभीर नोंद तलाठी आणि मंडळ अधिकाºयांनी संयुक्त चौकशी अहवालात नमूद केली आहे. तसेच १५ ऑक्टोबर २० ते २७ नोव्हेंबर २० या कालावधीत २१५०० ब्रासचे भरणा केलेल्या चलनाच्या छायाप्रती प्रशासनाला सादर केल्या. मात्र, प्रत्यक्षात घटनास्थळी २१५०० ब्रासपेक्षाही जास्त गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तलाठी आणि मंडळ अधिकारी आवार यांनी केलेल्या संयुक्त चौकशी अहवालात ‘मॉन्टे कार्लो’ कंपनीने केलेल्या उत्खननाबाबत तांत्रिक तपासणी करण्याचे नमूद केले आहे. परंतू, गत सव्वा दोन महिन्यांपासून महसूल प्रशासनाकडून याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘कुठे तरी पाणी मुरत’ असल्याच्या शंकेला वाव मिळत आहे. यासंदर्भात महसूल विभागातील अधिकाºयांशी संपर्क केला असता, त्यांनी याप्रकरणी माहिती देण्याचे टाळले.

टॅग्स :khamgaonखामगाव