शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तांतरापूर्वी खामगाव पालिका इमारतीला जलाभिषेक!

By admin | Updated: December 27, 2016 02:20 IST

खामगाव पालिकेत राजकीय नाट्य.

खामगाव, दि. २६-येथील नगरपालिकेत मंगळवारी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदभार स्वीकारणार आहेत. या पृष्ठभूमीवर सोमवारी पालिकेत चांगलेच राजकीय नाट्य रंगले. दरम्यान, मावळत्या नगराध्यक्षांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केला. पालिका इमारतीला जलाभिषेक करून स्वच्छता करण्यात आली.खामगाव नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदासह ३३ नगरसेवकांच्या निवडीसाठी गेल्या २७ नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. २८ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. मात्र, मावळत्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच निवडणुका जाहीर झाल्याने, नियमानुसार नगराध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी नवीन नगराध्यक्षांसह नगरसेवकांना पदभार स्वीकारण्याची तांत्रिक अडचण निर्माण झाली. तथापि, सोमवार, २६ डिसेंबर रोजी मावळत्या नगराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार सोडण्यापूर्वी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केला. तसेच विभागप्रमुखांची बैठकही बोलाविली. त्याचवेळी मंगळवारच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नवीन सत्ताधार्‍यांकडून पालिकेत विभागप्रमुख आणि कर्मचार्‍यांची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत उपस्थित राहण्यावरून कर्मचार्‍यांमध्ये मानापमान नाट्यही घडले. दरम्यान, मावळत्या नगराध्यक्षांची बैठक संपताच, नवीन सत्ताधार्‍यांच्या माध्यमातून पालिका कर्मचार्‍यांनी नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीची स्वच्छता केली. तसेच यावेळी इमारतीला जलाभिषेकही करण्यात आला. नगराध्यक्ष आज स्वीकारणार पदभार!मावळत्या नगराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा नगरसेवक मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी सत्ताधार्‍यांकडून खास व्यवस्था करण्यात आली असून, पालिका इमारतीवर विद्युत रोषणाईही करण्यात आली. या सोहळ्याला राज्याचे कृषीमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, खामगाव मतदारसंघाचे आ. आकाश फुंडकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.