शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाकडून दिव्यांगांची अवहेलना - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:25 IST

शेगाव: येथील संत गजानन महाराज संस्थानच्या आनंद  विसावामधील वारकरी सभागृहात प्रहार अपंग क्रांती  आंदोलन, अपंग कल्याण आयुक्तालय व यशवंतराव  चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (पुणे) यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित दोन दिवसीय दिव्यांग बांधवांच्या  कार्यशाळेचा २ सप्टेंबर रोजी समारोप करण्यात आला.

ठळक मुद्देदिव्यांग बांधवांच्या कार्यशाळेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: येथील संत गजानन महाराज संस्थानच्या आनंद  विसावामधील वारकरी सभागृहात प्रहार अपंग क्रांती  आंदोलन, अपंग कल्याण आयुक्तालय व यशवंतराव  चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (पुणे) यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित दोन दिवसीय दिव्यांग बांधवांच्या  कार्यशाळेचा २ सप्टेंबर रोजी समारोप करण्यात आला.  यावेळी दिव्यांगांना मार्गदर्शन करताना आमदार बच्चू कडू  म्हणाले की, राज्यातील दिव्यांग बांधव अत्यंत हलाखीचे  जीवन जगत आहेत.  शारीरिक असहाय्यतेमुळे त्यांना  सक्षमरीत्या जीवन जगता येत नाही. प्रशासनाकडून त्यांची  अवहेलना केली जाते. शासनाकडून दिले जाणारे  मानधनही तोकडे आहे. त्यामुळे दिव्यांगांना मोठय़ा  अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या समस्या  सोडविण्यात येऊन मानधनात वाढ करण्यात यावी, अशी  मागणी आपण शासनाकडे केलेली आहे. १0 सप्टेंबरपर्यंत  शासनाने दिव्यांगांच्या समस्या मार्गी लावून मानधनात वाढ  न केल्यास ११ सप्टेंबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात  आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.  यावेळी  व्यासपीठावर प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे महाराष्ट्र सं पर्कप्रमुख रामदास खोत, राज्य समन्वयक रामदास म्हात्रे,  राजाभाऊ गोकुळाष्टमी, अभय पवार, प्रहार जनशक्ती  पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते, उपजिल्हाप्रमुख त था प्रहार अपंग क्रांतीचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा संजय  इंगळे, नीलेश घोंगे, प्रहार महिला आघाडीच्या प्रांजली  धोरण, युवराज देशमुख, अल्पेश भांड, राजू मसने, किरण  दराडे, विनोद पवार, गोलू ठाकूर, दत्ता पाकधाने यांची उ पस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना आमदार कडू म्हणाले की,  दिव्यांगांसाठी बर्‍याच योजना आहेत; मात्र प्रशासनाच्या  उदासीन धोरणांमुळे सदर योजनांची अंमलबजाणी प्रभावी पणे होत नाही.  दिव्यांगांच्या १९९५ च्या कायद्याची  अंमलबजाणी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी  आपला शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. यावेळी प्रहार  अपंग क्रांती आंदोलनाच्या राज्यातील पदाधिकार्‍यांना  सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख बक्षीस देऊन गौरव  करण्यात आला. तसेच दिव्यांगांच्या योजना,  शासन  निर्णय याची विस्तृत माहिती सांगणार्‍या प्रहार अपंग क्रांती  आंदोलनाच्या पुस्तकाचे वाटपही करण्यात आले. यावेळी  राज्यातील २ हजारावर दिव्यांग बांधव व भगिनींची उपस् िथती होती.