शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

समायोजन स्थगीती आदेशामुळे प्रशासन गोंधळात

By admin | Updated: August 9, 2014 00:05 IST

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षक समायोजन प्रक्रियेला स्थगीती आदेशामुळे जिल्हा परिषद प्रशासन गोंधळात.

बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शिक्षक समायोजन प्रक्रियेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिलेल्या स्थगीती आदेशामुळे जिल्हा परिषद प्रशासन गोंधळात पडले आहे. गेल्या दोन दिवसापासून प्रशासनातील अधिकारी व जिल्हा परिषदेचे वकिल यांनी या स्थगीती आदेशावर बराच खल केल्या नंतर आता पुन्हा नव्याने समायोजनची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलतांना सांगीतले.जिल्हा परिषदेमधील उच्च प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया ५ ऑगस्ट पासून सुरू झाली. मात्र या प्रक्रियेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभेने यापूर्वीच न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ६ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने निकाल दिला. हा निकाल ग्राह्य धरून जिल्हा परिषदेने लगेच समायोजनाची प्रक्रिया थांबविली. मात्र या निकालाचा शब्दश: नेमका अर्थ काय निघतो याची कोणतीही शाहनिशा न करताच प्रक्रियेला दिलेली स्थगीती चुकीची आहे असा वाद सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी व वकीलांकडून या निकाल पत्रावर बराच खल केल्या गेला. ह्ययादी तयार करण्यास हरकत नाही. मात्र न्यायालयाच्या पुढील आदेशा पर्यंत आदेश देवू नकाह्ण असे या आदेशात म्हटले आहे. असे असताना जिल्हा परिषदेने समायोजन प्रक्रियेला दिलेली स्थगीती योग्य नसल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आल्या नंतर आता समायोजनाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी समायोजनाची उर्वरीत प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगीतले.