शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी दिनी गुंजला वीर एकलव्याचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:16 IST

बुलडाणा :  बुलडाणा शहरात जागतिक आदिवासी दिन ९ ऑगस्ट रोजी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातून सकाळी मोटारसायकल रॅली आणि संध्याकाळी सर्व आदिवासी बांधवांनी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये सर्वत्र वीर एकलव्याचा जयघोष करण्यात आला.

ठळक मुद्देबुलडाणा शहरात मोटरसायकल रॅलीसह विविध कार्यक्रमबस स्टॅण्डवर एकलव्याच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  बुलडाणा शहरात जागतिक आदिवासी दिन ९ ऑगस्ट रोजी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातून सकाळी मोटारसायकल रॅली आणि संध्याकाळी सर्व आदिवासी बांधवांनी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये सर्वत्र वीर एकलव्याचा जयघोष करण्यात आला.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी समाजबांधवांनी एकत्रित येऊन उत्सव समितीचे आयोजन केले होते. या समितीच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसह आदिवासी दिन उत्साहात पार पडला. सकाळी १0 वाजताच्या सुमारास येथील भिलवाड्यात वीर एकलव्य, आदिवासी नायक बिरसा मुंडा, क्रांतिवीर तंट्या भिल्ल, समशेरसिंग पारधी, विरांगणा राणी दुर्गावती या आदिवासी अस्मितांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी गुलाबराव ठाकरे, रामू मोरे, अरुण बरडे, उत्तम मोरे, एकनाथ मोरे, बाळू मोरे, वसंता बरडे, राजेश टारपे, विनोद डाबेराव, गजानन सोळंके, ज्ञानेश्‍वर राठोड, नगरसेवक कैलास माळी तसेच समितीचे अध्यक्ष विनोद ठाकरे, कोषाध्यक्ष सुनील बरडे, लखन गुलाबराव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आदिवासी दिनानिमित्त शहरातून मोटारसायकल रॅली निघाली. मुख्य मार्गाने महत्त्वाच्या चौकांमधून निघालेल्या या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष आकर्षित केले. आदिवासी ध्वज आणि आदिवासी दैवतांचा जयजयकार करीत रॅलीने मार्गक्रमण केले. बस स्टॅण्डवर एकलव्याच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान भिलवाड्यातूनच मिरवणुकीला प्रारंभ झाला. प्रत्येक आदिवासी कुटुंब या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये  रत्नमाला मोरे, गिरजा पवार, नंदिनी टारपे, सरला बरडे, मंगलाबाई निकम, मंताबाई ठाकरे, कुंताबाई पिंपळे, योगीता माळे, मंगला माळे, साईबाई बरडे यांनी आदिवासी महिलांना मिरवणुकीत सहभागी करून घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. दिवसभरातील संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीच्या पदाधिकार्‍यांसह सुरेश पिंपळे, वसंता बरडे, सतीश मोरे, उमेश बरडे, विजय ठाकरे, संदीप गायकवाड, संतोष बरडे, किशोर ठाकरे, संतोष मोरे, विनोद माळे, प्रवीण बरडे, रवी मोरे, चंद्रकांत बरडे, दिनेश मोरे, विशाल गायकवाड, तुळशीराम गायकवाड, किरण ठाकरे, सोनू माळे, लखन गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.