शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हजयात्रेसाठी अतिरिक्त शुल्क, हज कमिटीला मागितले उत्तर

By सदानंद नाईक | Updated: May 20, 2023 21:29 IST

१५ जूनपर्यंत मुदत, अतिरिक्त रकमेेच्या तफावतीबाबतही आदेश

सदानंद सिरसाट, खामगाव (बुलढाणा): नागपुरातील हज यात्रेकरूंकडून ६० हजार, तर संभाजीनगर येथून ८७ हजार रुपये अतिरिक्त भाडे आकारण्याचा हज कमिटी ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेनुसार न्यायालयाने शुक्रवारी कमिटीला नोटीस बजावत १५ जूनपर्यंत उत्तर मागवले आहे. सोबतच यात्रेकरूंना मुंबई येथून यात्रा सुरू करणे तसेच शुल्काच्या तफावतीबाबत समितीकडे निवेदन देऊन त्यावर दहा दिवसांत निर्णय घेण्याचेही बजावले आहे.

यावर्षी देशभरातून जवळपास दीड लाखांपेक्षा अधिक यात्रेकरू हजसाठी जाणार आहेत. त्यासाठी हज कमिटी ऑफ इंडियाने देशात विविध उड्डाण ठिकाणे निश्चित केली. त्यापैकी महाराष्ट्रात मुंबई, नागपूर व संभाजीनगर ही ठिकाणे आहेत. संभाजीनगर व मुंबई येथील ठिकाणच्या शुल्कामध्ये ८८ हजार, तर नागपूर येथे ६३ हजार रुपयांपर्यंत फरक आहे. ही तफावत मोठ्या प्रमाणात असल्याने ती अतिरिक्त रक्कम कमी करावी, यासाठी अमरावतीसह अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील २४ जणांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. ॲड. राम कारोडे यांनी त्यांची बाजू न्यायालयात मांडली. त्यावर न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम आदेश दिला. त्यामध्ये शुल्कातील तफावतीबाबत १५ जूनपर्यंत हज कमिटी ऑफ इंडियाने स्पष्टीकरण द्यावे, याचिकाकर्त्यांनी कामाच्या दोन दिवसांत समितीला निवेदन देत त्यामध्ये त्यांचे बोर्डिंग ठिकाण मुंबई करण्याचा निर्णय दहा दिवसांत घ्यावा, याचिकाकर्त्यांनी रक्कम भरली नसल्यास न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून ती जमा करावी, असेही आदेशात न्यायाधीश उर्मिला जोशी-फाळके यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Haj yatraहज यात्रा