शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणारी टोळी सक्रिय

By admin | Updated: November 18, 2016 02:36 IST

सिल्लोड-धाडदरम्यान गुंगीचे औषध देऊन महिलेचे दागिने पळविले!

डोमरुळ(जि. बुलडाणा), दि. १७- प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे अशाप्रकारची टोळी या भागात सक्रिय झाल्याचे निदर्शनास येत आहे. बुलडाणा तालुक्यातील डोमरूळ माहेर असलेल्या कांताबाई सुरेश अपार, रा. सिल्लोड जि. औरंगाबाद या १६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता सिल्लोडवरून पुणे-जळगाव (जामोद) बसने माहेरी येत होत्या; मात्र त्या धाड येथे न उतरता जळगाव (जामोद) येथे बसमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. कांताबाई अपार या डोमरूळ येथील माहेरी १६ नोव्हेंबर रोजी पुणे-जळगाव (जामोद) क्र. एम.एच.४0, एन ६३६५ क्रमांकाच्या बसने सिल्लोडवरून येत होत्या. त्या गाडीत आधीच बसलेल्या एक महिला आणि तिच्यासोबत बसलेल्या पुरुषाने त्यांना जागा देऊन गप्पा गोष्टी करत सलगी वाढवली. गप्पा गोष्टी करताना भोकरदन जि. जालन्याच्या पुढे आल्यावर त्या महिलेने कांताबाई अपार यांना बिस्कीट खाण्याचा आग्रह केला. त्यांनी ते बिस्कीट घेतले. गप्पागोष्टी करताना ती महिलासुद्धा बिस्कीट खायला लागली. त्यामुळे कांताबाईनेसुद्धा माहोरा जवळ असताना बिस्कीट खाण्यास सुरुवात केली. तोपर्यंंंत घरून आलेला फोन, नातेवाइकाच्या फोनवर त्यांचे बोलणे होत होते; परंतु धाडमध्ये त्यांची वाट बघत असलेले नातेवाईक चार तास झाले; मात्र बस येईना व फोनही लागत नसल्याने सर्वांंंची तारांबळ उडाली. नांदुरा येथे याच बसवर नातेवाइकांना पाठवून शोध घेतला. वाहकाला विचारले तर बसमध्ये अशा नावाची महिला नाही म्हणून सांगितले; परंतु शेवटी जळगाव (जामोद) येथील नातेवाइकांना फोनद्वारे कळवून बस बघण्यास सांगितली. त्या बसच्या वेळेवर तेथे हजर झाले. बसमधील सर्व प्रवासी उतरून बस आगारात जाण्यास निघाली. बस थांबवून परत वाहकाला कांताबाईविषयी विचारणा केली तेव्हा दोघे जण बसमध्ये चढून सिटाखाली बघत असताना शेवटच्या सिटखाली कांताबाई बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. तेव्हा त्यांना बाहेर काढून तेथील खासगी दवाखान्यात भरती करून तेथून बुलडाणा येथे आणले. १७ नोव्हेंबर रोजी दवाखाण्यातून त्यांना घरी आणले. त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोन्याची पोथ, कानातील रिंगा, चेन, बोरमाळ, मनी मंगळसूत्र, तर चांदीचे पायातील जोडवे त्या चोरट्यांनी काढून घेतले. त्यांचे पती सुरेश अपार यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन सदर घटनेची माहिती दिली. बुलडाणा पोलिसांनी सदर घटनेची माहिती घेऊन कांताबाई यांचा जबाब घेऊन सिल्लोड जि. औरंगाबाद येथे तक्रार वर्ग केली. सदर घटनेचा तपास सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जोगदंडे हे करीत आहे. या अगोदर १६ नोव्हेंबर रोजी धाड बसस्थानकावर कुंबेफळ येथील महिलेची बसमध्ये चढत असताना गळ्यातील पोथ चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती.