बुलडाणा वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घाटबोरी परिक्षेत्रातील वनपाल वनरक्षकांनी सापळा रचला. त्यावेळी मालेगाव- मेहकर रस्त्यावर मौजे डोणगाव, ता. मेहकर गावच्या हद्दीत ट्रक क्रमांक एमपी-०९ एचएपी ४९९५ हा विनापास परवाना आडजात प्रजातीचा लाकूडमाल अवैधरीत्या वाहतूक करताना आढळून आला. याप्रकरणी सादिक अली, रा. पातूर, जि. अकोला व शेख अब्दुल रहीम यांच्याविरुद्ध महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ चे कलम ३ व ४ आणि भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम ४१ २(ब) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच ट्रकसह १५ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या मार्गदर्शनात संदीप गवारे, एस.वाय. बोबडे, पी.जी. भालेराव, महेंद्र गायकवाड आणि वनमजुरांनी ही कारवाई केली.
डोणगाव येथे अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:34 IST