शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात २५ वाहनांवर कारवाई!

By admin | Updated: May 25, 2017 00:51 IST

विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्यांकडून ४ लाख २५ हजाराचा दंड वसूल

संग्रामपूर : तालुक्यामधील नदी पात्रामधून विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गत वर्षात संग्रामपूर तहसील कार्यालयामार्फत २५ कारवाया करण्यात आल्या आहेत. या झालेल्या कारवायांमधून ४ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे.संग्रामपूर तालुक्यामधून वान नदी तसेच पूर्णा नदी वाहते. या नदीपात्रांमध्ये पावसाळा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाळू असते. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर तसेच शेगाव तालुक्यामधील रेती माफीया हे मोठ्या प्रमाणात विना परवाना रेतीची वाहतूक करीत असतात. अशा वाहनधारकांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येते. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या एका वर्षामध्ये विना परवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर तसेच ट्रकद्वारे रेतीची वाहतूक करणाऱ्यावर संग्रामपूर तहसील कार्यालयामार्फत २५ कारवाया करण्यात आल्या आहेत; मात्र तरीही मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीतही अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा तालुक्यातील व बाळापूर तालुक्यातील रेती माफीया मोठ्या प्रमाणात विना परवाना रेतीची वाहतूक करीतच आहेत. तहसीलकडे वाहन नसल्यामुळे रेती चोरीत वाढ!गत तीन वर्षापासून संग्रामपूर तहसील कार्यालयाची तीन वाहने नादुरुस्त अवस्थेत पडलेले आहे. त्यामुळे तहसीलदारांना विना परवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पकडण्यासाठी दुचाकीवर नदीपात्रात जावे लागते. रात्री-बेरात्री नदीपात्रात जाण्यासाठी तहसील कार्यालयाला चारचाकी वाहन उपलब्ध नसल्यामुळे याचा फायदा रेती माफीया घेत आहेत. रात्री-बेरात्री तहसीलदारांना दुचाकीवर नदीपात्रामध्ये जाता येत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी या वाहनावर कारवाया करता येत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी चोरट्यामार्गाने विना परवाना रेतीची वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देवून तहसील कार्यालयास तातडीने वाहन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.