शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

विना परवानगी लग्न समारंभ करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असतानाही काही ठिकाणी धुमधडाक्यात विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. लग्नसोहळे करणाऱ्यांनी लग्नमंडपात सावधान होण्याआधी ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असतानाही काही ठिकाणी धुमधडाक्यात विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. लग्नसोहळे करणाऱ्यांनी लग्नमंडपात सावधान होण्याआधी स्वत:च पहिले सावधान होणे गरजेचे झाले आहे.

‌ अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिखली तालुक्यातील धोत्रा नाईक येथे १८ एप्रिल रोजी रमेश गोविंदा जाधव (वय ४५, रा. धोत्रा नाईक) यांनी त्यांच्या मुलीचा लग्न समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु लग्नसमारंभासाठी तहसीलदार चिखली यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने अखेर अमडापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच धोत्रा नाईक येथील गजानन तोताराम मिसाळ (वय ४५) यांनीसुद्धा त्यांच्या मुलींचे लग्न १९ एप्रिल रोजी आयोजित केले होते. परंतु त्यांनीसुद्धा कोणतीही शासनाची परवानगी न घेतल्याने त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही वधूपित्यांविरुद्ध तलाठी वनिता किशोर मोरे यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्ररीवरून विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. यापुढे लग्न सोहळे साजरे करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना वाढतोय, नियम पाळा : ठाणेदार वानखेडे

कोरोना महामारीच्या संकटातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी कुठेही गर्दी करू नये, अशा शासनाकडून वारंवार सूचना केल्या जात आहेत. शासनाच्या आदेशामध्ये २५ लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पाडा, असे असताना विनाकारण गर्दी जमू नये, असे आवाहन ठाणेदार अमित वानखेडे यांनी केले आहे. मुलीकडील असो वा मुलाकडील असो आनंदाचा क्षण असतो परंतु सध्या कोरोना महामारी या सारखे आजार पसरत असल्याने वऱ्हाडी मंडळीनी जास्त लोक न जमवता कमीत कमी लोकांमध्ये लग्नसोहळे साजरे करावे, असे आवाहनही ठाणेदारांनी केले आहे.