शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार वाहनधारकांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 12:04 IST

Khamgaon News : खामगाव शहर पोलिसांनी ०७ मार्च ते ३१ मे या कालावधीत तब्बल ४००० पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करीत ८ लक्ष रुपयांचा दंड वसूल केला.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  कडक निर्बंध कालावधीत सतर्कता आणि कारवाईत तत्परता दाखवित, खामगाव शहर पोलिसांनी ०७ मार्च ते ३१ मे या कालावधीत तब्बल ४००० पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करीत ८ लक्ष रुपयांचा दंड वसूल केला. त्याच वेळी  पालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईद्वारे विनामास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या कारवाईच्या माध्यमातून २ लक्ष ६० हजारांचा दंड वसूल केला आहे. १५ फेब्रुवारीपासून कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढीस लागला होता. शहरासह ग्रामीण भागात महिन्याभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत होती. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, काही प्रमाणात दिलासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कडक निर्बंध कालावधीत विनामास्क फिरणाऱ्या, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांना शहर पोलिसांनी चांगलेच वठणीवर आणले. पालिका पथकाच्या मदतीने साधारणपणे दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११ लक्ष रुपयांचा दंड शासकीय तिजोरीत जमा केला आहे. बुलडाणा जिल्ह्यात  ४,००० हजार मोटार वाहन कायद्याच्या सर्वाधिक कारवाया खामगाव शहर पोलिसांनी केल्या आहेत. यामध्ये ट्रिपल सीट प्रवास, लायसन्स न बाळगणे, सोशल डिस्टन्स ठेवून प्रवास न करणे, यासह विविध प्रकारचा दंड ठोठावला आहे.

२६३ गुन्हे दाखल कडक निर्बंध कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, इतर व्यावसायिक दुकाने उघडणाऱ्या २६३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सलून, कापड, झेरॉक्स, वाहने आणि इतर प्रकारच्या दुकानांचा समावेश आहे.  या सर्व दुकानदारांविरोधात भादंवि कलम १८८, २६९, २७०, आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१(ब), तसेच  साथ रोग अधिनियम ०३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत.

कडक संचारबंदी काळातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस प्रशासनाने सुरुवातीपासूनच लक्ष्य केंद्रित केले. या कालावधीत मोटार वाहन कायद्यानुसार ४,००० कारवाई करीत ८ लक्ष रुपयांचा दंड वसूल केला आहे.- सुनील अंबुलकरशहर पोलीस निरिक्षक, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावtraffic policeवाहतूक पोलीस