शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीसोबत असभ्य वर्तन करणा-यांवर कारवाई

By admin | Updated: August 14, 2015 00:09 IST

मलकापूर येथील घटना; युवकांनी दिला चोप.

मलकापूर ( जि. बुलडाणा) : सुनसान भागात नवीन बांधकाम सुरु असलेल्या जागेचा सहारा घेत एका तरुणीसोबत दोन इसमांना नको त्या अवस्थेत आढळून आल्याने त्या भागातील तरुणांनी दोन्ही इसमांना चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना १२ ऑगस्टच्या सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान मुकुंदनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी त्या इसमांविरुध्द असभ्य वर्तणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक मुकुंदनगर परिसरात नवीन बांधकामे सुरु आहेत. यातील एका बांधकामाचा सहारा घेत १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी एक तरुणी व दोन इसम बिल्डींगमध्ये नको ते चाळे करीत असल्याचे परिसरातील काही युवकांना कळले. या युवकांनी त्याठिकाणी त्या इसमांना काही समजण्या अगोदरच धडक देत त्यांना नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडत त्यांना चांगलाच चोप दिला. या दरम्यान त्या तरुणीने तोंडाला स्कार्प बांधून त्याठिकाणावरुन पोबारा केला. जमलेल्या युवकांनी त्या दोन्ही युवकांना यथेच्छ चोप देत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पीएसआय राहुल मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी सै.खलील सै.रसुल वय ३८ रा. ताजनगर पारपेठ व शे. जावेद शे.छोटू वय ३३ रा. काझीप्लॉट पारपेठ या दोघांविरुध्द कलम ११0/१0७ अन्वये असभ्य वर्तणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. या भागात नेहमीच असे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी अशा असभ्य वर्तन करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केल्या जात आहे.