शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

५0 वाहनांवर कारवाई

By admin | Updated: September 3, 2014 22:56 IST

गणेश उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सिंदखेडराजा पोलिसांची धडक मोहीम.

सिंदखेडराजा : उत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सध्या बिघडलेल्या वाहतुक व्यवस्थेला ताळ्यावर आनण्यासाठी पोलिस विभागाने मोहिम हाती घेतली आहे. सिंदखेडराजा पोलिस स्टेशनच्यावतीने ३ सप्टेंबर रोजी जवळपास ५0 वाहनांवर धडक कारवाई करुन ५ हजार ७00 रुपये दंड वसूल केला.सिंदखेडराजा शहरातून मुंबई नागपूर महामार्ग जातो. या महामार्गावर रोडच्या कडेला मोटारसायकल व चारचाकी वाहने लावून वाहनधारक आपली कामे करण्यासाठी फिरतात. त्यामुळे अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाचा रस्त्याने जाणार्‍या वाहनांना नेहमीच अडथळा होतो. अशा बेफीकीर वाहनधारकांना धडा शिवकवण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली. जवळपास ५0 वाहने पकडून ५ हजार ७00 रुपये दंड पोलिसांनी वसुल केला. दरम्यान ज्या वाहनाचे मालक वाहनाजवळ हजर नाहीत अशी वाहने पोलिसांनी उचलून ट्रॅक्टरमध्ये भरली व ही वाहने सरळ पोलिस स्टेशनला जमा केली. पोलिसांनी अचानक घेतलेल्या या भुमिकेमुळे वाहनधारकांना चांगला आर्थिक भुर्दंड बसला. ही मोहिम अशीच अधून मधून राबवावी अशी अपेक्षा आहे. या मोहिमेत ठाणेदार बी.डी.मसराम, पीएसआय चित्तडवाड यांच्यासह ४0 पोलिस कर्मचार्‍यांचा सहभाग होता.

*तगडा पोलिस बंदोबस्तसिंदखेडराजा शहरात जवळपास १६ सार्वजनिक गणेश मंडळ असून महामार्ग हाच मिरवणुकीचा मार्ग आहे. गणेशोत्सवासाठी शहरात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून, यामध्ये २0 होमगार्ड, ५ स्त्री व ५ पुरुष प्रशिक्षणाधारी पोलिस, २ अधिकारी व १0 पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. बंदोबस्तासाठी ३ पायी पेट्रोलिंग फिरते पथक असून, एका पथकात ५ पोलिस कर्मचारी समाविष्ट आहेत.

गणेशोत्सवादरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी ६ सप्टेंबर पर्यंत विशेष मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी ६ पोलिसांचे १ मोबाईल पेट्रोलिंग पथक व २ दुचाकी पेट्रोलिंग पथक कार्यान्वीत करण्यात आले आहेत.-बी.डी.मसरामठाणेदार, सिंदखेडराजा.