शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील आरोपीस अटक

By admin | Updated: September 2, 2016 02:27 IST

आदिवासी वृद्ध महिलेचे खूनप्रकरण; मध्यप्रदेशातील दानपहाडी येथे एकास अटक.

शेगाव(जि. बुलडाणा), दि. १: तालुक्यातील पिंगळी शेतशिवारातील आदिवासी वृद्ध महिलेच्या खूनप्रकरणी सोनाळा पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी मध्यप्रदेशातील दानपहाडी येथे एकास अटक केली. पिंगळी शिवारातील आदिवासी महिला कलाबाई भास्कर हिच्या खुनानंतर पिंगळी शिवारात कुजलेल्या तसेच अवयव विखुरलेल्या अवस्थेत या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर या घटनेचे तब्बल २७ दिवसांनी गूढ उकलले होते. यानंतर मंगळवारी सोनाळा पोलिसांनी मृताच्या पतीविरुद्ध कलम ३0२ भादंविनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला होता; मात्र आरोपी पती हा फरार होण्यास यशस्वी झाला होता. दरम्यान, या आरोपीच्या शोधार्थ सोनाळा पोलीस स्टेशनचे चार पोलीस कर्मचार्‍यांचे पथक मध्य प्रदेशात २९ ऑगस्टच्या रात्री रवाना झाले होते. दरम्यान, १ सप्टेंबर रोजी आरोपी मधुकर भास्कर याला दुपारी साडे बारा वाजेदरम्यान मध्यप्रदेशातील खकनार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दान पहाडी येऊन आरोपीला अटक करण्यात या पोलीस पथकाला यश आले. या पोलीस पथकामध्ये सोनाळा पोलीस स्टेशनचे पीएसआय गजानन जोशी, पोकाँ निशांत कळसकर, पोकाँ भाऊ मोरे, महिला पोकाँ पौर्णिमा साने आदींचा समावेश होता. मध्यप्रदेशातील ३८-४0 गावांमध्ये या आरोपींचा शोध घेतल्यानंतर खकनार पो.स्टे. अंतर्गत येत असलेल्या दात पहाडी येथील जंगलातील एका रखवालदाराच्या घरुन अटक करण्यात आली.