शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन ऑडिटच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 11:40 IST

Oxygen audits at Covid Hospital : मेडिकल ऑडिट आणि प्लांट उभारणीसंदर्भातील गुणवत्ता या दोन्ही बाबींचे हे ऑडिट होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क   बुलडाणा : ऑक्सिजनचा तुटवडा आणि नाशिकमधील ऑक्सिजन प्लांटला गळती लागल्याने झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा येथील ऑक्सिजन प्लांटचेही येत्या दोन ते तीन दिवसांत ऑडिट करण्यात येणार आहे. यामध्ये मेडिकल ऑडिट आणि प्लांट उभारणीसंदर्भातील गुणवत्ता या दोन्ही बाबींचे हे ऑडिट होणार आहे.राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हे ऑडिट करण्यात येणार असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी लवकरच एक आदेश काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रामुख्याने ऑक्सिजनची गळती, रुग्णांना तो देताना त्याचा दाब व दुर्घटना टाळण्यासाठी प्लांट उभारताना योग्य काळजी घेतली आहे किंवा नाही, याची यात प्रामुख्याने पाहणी होणार आहे. यासंदर्भात महसूल यंत्रणा आणि आरोग्य विभागाने २३ एप्रिल रोजी एका बैठकीत सविस्तर चर्चा केली असून, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनीही कोविड समर्पित रुग्णालयातील डॉक्टरांशी याबाबत एका छोटेखानी बैठकीत माहिती घेतली.दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून ऑक्सिजन उपलब्धतेसंदर्भातच अडचणी असल्याने अनुषंगिक पावले उचलली गेली नव्हती. मात्र, जिल्ह्याला आता जवळपास दहा केएल ऑक्सिजन उपलब्ध झाला असून, आगामी पाच दिवसांची चिंता तूर्तास तरी मिटली आहे. २३ एप्रिल रोजी ५.३ केएल आणि २४ एप्रिल रोजी ६ केएल ऑक्सिजन जिल्ह्यास उपलब्ध झाला आहे. दरम्यान, ऑक्सिजनचे वैद्यकीय ऑडिट करताना रुग्णांना ऑक्सिजन देताना तो योग्य पद्धतीने दिला जातो किंवा नाही, त्यात सुसूत्रता आहे किंवा नाही, अशा बाबींचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. साधारणत: सरासरी ३० लिटर प्रती मिनिट या दाबाने हा ऑक्सिजन रुग्णांना देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करून ऑक्सिजन गळती व त्याचा अपव्यय टाळण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे यासंदर्भातील नोडल अधिकार यांनी सांगितले. आयसीयूमधील ऑक्सिजनवरील रुग्ण व आयसीयूबाहेरील ऑक्सिजनवरील रुग्ण यांना नेमका किती दाबाने ऑक्सिजन द्यावा, यासंदर्भातील सुसूत्रताही आणण्याचा  प्रशासकीय यंत्रणेचा प्रयत्न आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटल