शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

"एमसीए"च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात !

By admin | Updated: June 29, 2017 19:46 IST

अमरावती विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांचे साकडे; ६५० विद्यार्थ्यांचे लक्ष विद्यापीठाकडे

फहीम देशमुख / शेगाव तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) व अमरावती विद्यापीठातील समन्वयाच्या अभावाचा फटका मास्टर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लीकेशन (एमसीए)च्या व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांना बसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. थेट व्दितीय वर्षासाठी अर्ज स्वीकारण्यास विद्यापीठाने नकार दिल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. एमसीए हा पदव्युत्तर अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून या अभ्यासक्रमासाठी बीसीए, बीएस्सी, कॉम्प्युटर सायन्स आदी संगणक अभ्यासक्रमाशी संबंधित पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना एमसीच्या प्रवेश परीक्षेनंतर यापूर्वी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेता येत होता. मात्र आता विद्यापीठाने एमसीए अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश न देण्याचे धोरण आखले आहे. एमसीए अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासून म्हणजेच तीन वर्षे पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी बीसीए, बीएस्सी, कॉम्प्युटर सायन्स आदी संगणक अभ्यासक्रमाशी संबंधित पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना एमसीए च्या प्रथम वर्षाचा किमान ७५ हजार रुपये अतिरिक्त खर्च याशिवाय एक वर्ष अतिरिक्त द्यावे लागणार आहे. विदर्भात एमसीएचे एकूण २५ कॉलेजेस असून यामध्ये सुमारे १७५० विद्यार्थी शिक्षण घेतात. तर बीसीए, बीएस्सी, कॉम्प्युटर सायन्स आदी संगणक अभ्यासक्रमाशी संबंधित पदवी घेतलेले विद्यार्थी जे एमसीएच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ इच्छितात अशांची संख्या ६५० च्या जवळपास आहे. यासाठी विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश द्यावा असे साकडे पश्चिम विदर्भातील विद्यार्थी शृंग पाठक, शुभम श्रीनाथ, तृप्ती देशमुख, वैष्णवी देशमुख, स्नेहा विंचू, भाग्यश्री गेडाम आदी विद्यार्थ्यांनी घातले आहे. विद्यापिठाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.