शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पीएम स्वनिधीला शिफारसपत्राचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 17:01 IST

Buldhana News ८,२६३ फेरीवाल्यांपैकी केवळ १,८५९ फेरीवाल्यांनाच प्रत्यक्षात ही मदत मिळू शकली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  कोराना संसर्गाच्या काळात फेरीवाल्यांचे बिघडलेले अर्थकारण पाहता, त्यांचा व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी मदत व्हावी म्हणून पीएम स्वनिधी अंतर्गत सात टक्के सबसीडीवर दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येत आहे. परंतु, पालिकांकडून त्यासाठी आवश्यक शिफारसपत्रच उपलब्ध करण्यात येत नसल्याने ८,२६३ फेरीवाल्यांपैकी केवळ १,८५९ फेरीवाल्यांनाच प्रत्यक्षात ही मदत मिळू शकली आहे. पीएम स्वनिधीसाठी अर्ज केलेल्या ८,२६३ जणांपैकी ३६ टक्के अर्थात २,९७१ जणांनाच प्रत्यक्षात हे कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात या याजनेंतर्गतच्या लाभासाठी ८,२६३ जणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात १,८५९ जणांना १८ कोटी ५९ लाख रुपयांचे कर्जवाटप बँकांकडून करण्यात आले आहे. पालिकांच्या सर्वेक्षणानंतर त्यांच्याकडे नोंदणी असलेल्या फेरीवाल्यांची ऑनलाईन नोंदणी होऊन त्यांना पालिकेकडून बँकांसाठी शिफारसपत्र दिले जाते. त्यात संबंधित फेरीवाल्याचा विशिष्ट क्रमांक असतो. त्याआधारे बँकेच्या शाखेत पत नियंत्रण विभागाकडून सूचना मिळाल्यानंतर फेरीवाल्याचे खाते उघडून त्याला या योजनेंतर्गत दहा हजार रुपयांच्या मर्यादेत लाभ दिला जातो. मात्र, या संदर्भातील पालिका स्तरावर हाताळण्यात येणाऱ्या वेबसाईटवर तांत्रिक अडचणी येत असल्याने योजनेची अपेक्षित अंमलबजावणी करण्यात अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात या योजनेंतर्गत लाभासाठी फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज करूनही अवघ्या ३६ टक्के लाभार्थ्यांचीच कर्जप्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात २३ टक्के फेरीवाल्यांनाच लाभ दिला गेला आहे.

शिफारसपत्र मिळण्याच्या अडचणीमुळे प्रत्यक्षात फेरीवाल्यांना लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये क्युआर कोडसह अन्य समस्या मार्गी लावण्यात आल्या आहेत. शिफारसपत्रा संदर्भानेही काही बाबतीत शिथिलता देण्याच्या सूचना जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी पूर्वीच दिलेल्या आहेत.-नरेश हेडाऊ, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना