शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आट्या- पाट्या या खेळाने सशक्त खेळाडू तयार होतो : डॉ. दीपक कविश्वर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 13:26 IST

आट्यापाट्या या खेळामुळे  सर्व गुण विकासीत होवून सशक्त  खेळाडू तयार  होतो, असे आॅल इंडिया आट्यापाट्या  फेडरेशनचे सेक्रेटरी डॉ. दीपक कविश्वर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले .

- योगेश फरपट

खामगाव : आट्यापाट्या हा खेळ भारतातील पुरातन, देशी तसेच कमी खर्चिक खेळ असून इंटरनॅशनल चॅम्पयनशिप मध्ये आतापर्यंत भारताला चार वेळा सुवर्णपदक मिळालेले आहे. आट्यापाट्या या खेळामुळे  सर्व गुण विकासीत होवून सशक्त  खेळाडू तयार  होतो, असे आॅल इंडिया आट्यापाट्या  फेडरेशनचे सेक्रेटरी डॉ. दीपक कविश्वर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले .

प्रश्न : आट्या पाट्या या खेळाबद्दल काय सांगू शकाल ? आट्यापाट्या हा पुरातन काळी पाण्याच्या पाट्या आखून मैदान तयार करून चंद्रप्रकाशात खेळला जात होता. सन १९८१ साली तत्कालीन खासदार श्री.वा.धाबे यांनी खेळाला पुनरुज्जीवीत केले. पहिली राष्ट्रीय स्पर्धा नागपूर येथे झाली. तेव्हा ७ राज्य होती. त्यानंतर आट्यापाट्या खेळाचा विकास होत गेला. आज २५ राज्यात तर महाराष्ट्रातील २८ जिल्हयात हा खेळ खेळला जातो. केंद्रीय क्रिडा मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली तसेच महाराष्ट्रात राज्य सरकारची या खेळाला मान्यता आहे. याशिवाय महाराष्ट्र आॅलिम्पीकची मान्यता आहे. 

प्रश्न : आट्या पाट्या या खेळाला आजही का महत्व आहे. आट्यापाट्या हा खेळ भारतातील ग्रामिण व शहरी क्षेत्रात लोकप्रिय खेळ आहे. महाराष्ट्रात शालेय व महाविद्यालयीन स्तरावर पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी व आट्यापाट्या खेळाचा परिचय करण्यासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू महाराष्ट्रातून निर्माण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  

प्रश्न : आट्यापाट्या हा खेळ लोकापर्यत का पोहचू शकला नाही ़?आट्यापाट्या या खेळाबाबत लोकामध्ये जागरुकता नाही. त्यामुळे या खेळासाठी स्पॉन्सरशीप मिळत नाही ही खंत आहे. वास्तविक या खेळामुळे खेळाडूंची शारिरीक क्षमता मजबूत होवून सशक्त खेळाडू तयार होतो. त्याच्यामध्ये सहनशीलतेसह सर्व गुण विकसीत होण्यास मदत होते. त्यामुळे या खेळाला पुढे आणण्यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे. प्रसिद्धी माध्यमांनी देखील या खेळाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे असे वाटते. 

प्रश्न : खेळाडूंना आरक्षण आहे काय ?खो-खो, कबडड्ी या खेळाप्रमाणे आटयापाट्या देशी खेळ असून पूर्वी खो खो कबड्डीप्रमाणे या खेळाला पाच टक्के आरक्षण होते. परंतू २०१६ मध्ये सरकारने पाच टक्के आरक्षण बंद केले. त्यानंतर आॅल इंडिया आट्यापाट्या फेडरेशनचे वतीने राज्य व केंद्र सरकार यांच्याकडे खेळाडूंना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

प्रश्न : सरकारकडून काय अपेक्षा आहे? आट्या पाट्या या खेळाचा शालेयस्तरावर समावेश झाला आहे. त्याचप्रमाणे शालेय स्तरावर आट्यापाट्या स्पर्धा सर्वत्रच संपन्न होत आहे. सरकारकडून आट्यापाट्या खेळांडूसाठी शिवछत्रतपी पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत २५ खेळाडू व संघटनकांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. असे असतांना सर्व खेळांना आरक्षण आहे. मग या खेळाला आरक्षण का नाही असा प्रश्न आहे. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून खेळांडूंना आरक्षण देण्याची गरज आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत