शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आणेवारी ४८ पैसे, तरीही विमा मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:51 IST

राहेरी बु : सिंदखेड राजा तालुक्यातील सातही महसूल मंडलात यावर्षी अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील १०५ गावांमध्ये ओला दुष्काळ जाहीर ...

राहेरी बु : सिंदखेड राजा तालुक्यातील सातही महसूल मंडलात यावर्षी अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील १०५ गावांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या गावांमधील पिकांचा पंचनामा करण्यात आला असूनही अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे पीक विमा तत्काळ देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

दुसरबीड, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जेन, साखरखेर्डा, किनगांव राजा, सोनुषी आणि सिंदखेड राजा ही सात महसूल मंडले तालुक्यात आहेत. यामध्ये साखरखेर्डा, सोनुषी व शेंदुर्जेन या मंडलात सर्वाधिक पाऊस पडल्याने सोयाबीन, कपाशी ही पिके उद्ध्वस्त झाली होती. हीच परिस्थिस्ती दुसरबीड, मलकापूर, पांग्रा, किनगाव राजा, सिंदखेड राजा याही मंडलात होती. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हिरवा दाणा असतानाच कोंब फुटले होते. सोयाबीन पिकाला लागलेल्या शेंगा काळ्या पडल्याने दाणेही काळे पडले. त्यामुळे हेक्टरी चार क्विंटलच्या आतच सरासरी निघाल्याने पेरणी, डवरणी, बी फवारणी, खते काढणी, मळणी याचा सरासरी हिशोब केला तर मजुरी सोडाच झालेला खर्चही निघाला नाही. याच पिकांच्या उत्पन्नावर पुढील गहू, हरभरा, मका या रब्बीच्या पिकांचा खर्च अवलंबून असतो. मात्र, पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले. तालुक्‍यातील ४५ हजार शेतकऱ्यांपैकी २५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. सिंदखेड राजा तालुक्यातील १०५ गावांमधील आनेवारी ही पन्नास टक्केपेक्षा कमी असताना, शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधीही पाठपुरावा करताना दिसत नाहीत. केवळ खरडून गेलेल्या जमिनीचा पंचनामा करून त्यांनाच विमा कंपनीने मदत केली. मात्र, इतर शेतकऱ्यांना अद्यापही विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे. खरीप पिकांचा विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या विम्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र तालुक्यात आहे.

दुसरबीड मंडलामध्ये पाऊस जास्त झाल्याने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद ही पिके पूर्णपणे हातची गेली आहेत. आणेवारी ४८ पैसे असल्यामुळे पीक विम्याचा तातडीने लाभ मिळावा.

एकनाथराव देशमुख, शेतकरी, राहेरी बु.