शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अल्पवयीन वधूने प्रियकरासोबत लग्नाच्या आदल्या दिवशीच केले फिनाईल प्राशन

By अनिल गवई | Updated: March 9, 2023 17:17 IST

अल्पवयीन वधूने आपल्या प्रियकरासह िफनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: अल्पवयीन वधूने आपल्या प्रियकरासह फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अल्पवयीन युवती आणि तिच्या प्रियकराने फिनाईल प्राशन केल्यानतर रात्री उशीरा थेट शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. आई वडिल आपल्या इच्छेविरोधात लग्न लावून देत असल्याची आपबिती कथन केली. तसेच त्यामुळे आपण प्रियकरासह फिनाईल प्राशन केल्याचे सांगितले. त्यामुळे शहर पोलीसांनी गुरूवारी अल्पवयीन मुलीच्या आई, वडिलांविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. परिणामी, खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचे त्याच परिसरातील एका अल्पवयीन १८ वर्षीय मुलावर प्रेम आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना मिळताच, त्यांनी मुलीसाठी एक स्थळ शोधून तिचा विवाह ठरविला. नियोजित मुहूर्तानुसार गुरूवार ९ मार्च रोजी मुलीचा विवाह पार पडणार होता. दरम्यान, बुधवारी हळदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मुलीने घर सोडून आपल्या प्रियकरासोबत िफनाईल प्राशन केले. त्यानंतर रात्री उशीरा थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलीसांकडे आई वडिलांच्या िवरोधात तक्रार दाखल करीत िफनाईल प्राशन केल्याची माहिती पोलीसांना दिली. त्यावरून पोलीसांनी दोघानांही तातडीने खामगाव येथील सामान्य रूग्णालयात दाखल केले. तर मुलीच्या तक्रारीवरून आई वडिलांविरोधात बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ च्या कलम ११ अन्वये गुन्हा दाखल केला.

सामान्य रूग्णालयात नातेवाईकांची एकच गर्दी

अल्पवयीन मुलीने प्रियकरासोबत पलायन आणि फिनाईल प्राशन केल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना समजली. ही वार्ता वार्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनीही सामान्य रूग्णालयात धाव घेतली. यावेळी मुलगी आणि मुलीच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाचीही झाली. मात्र, पोलीसांनी वेळीच प्रकरण निस्तारले.

वरपक्षात खळबळ

अल्पवयीन वधूच्या आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाचा चांगलाच धक्का वर पक्षातील मंडळींना बसला. सुरूवातीला वधू पळून गेल्याचा त्यांना निरोप मिळाला. या धक्क्यातून सावरत नाही तोच ितने प्रियकरासोबत िफनाईल प्राशन केले आणि तिच्या आई वडिलांिवरोधात गुन्हा दाखल झाल्याचे एकापाठोपाठ धक्के बसल्याने वर पक्षात चांगलाच सन्नाटा पसरल्याचे समजते. सुत्रानुसार या सर्व प्रकरणामुळे वर पक्ष भांबावल्याचेही समजते.