शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या! चिखलीत आढळला कोरोनाचा एक रूग्ण; नवीन उपप्रकार जेएन १ ची लागण

By निलेश जोशी | Updated: January 1, 2024 18:01 IST

राज्यात काही दिवसांपासून कोविडचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.

चिखली (बुलढाणा) : कोरोना विषाणूचा नवीन जेएन-१ या उपप्रकाराचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली असून, याची लागण झालेला पहिला रुग्ण चिखलीत आढळला आहे. यामुळे धास्ती वाढली आहे. मात्र लक्षणे सौम्य आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, खबरदारी घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

राज्यात काही दिवसांपासून कोविडचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. नव्या वर्षात याचा फैलाव होताना दिसून येत आहे. शहरातील ४८ वर्षीय एका आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची काही लक्षणे जाणवल्याने त्यांनी ‘रॅपिड टेस्ट’ केली असता त्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. सदर आरोग्य कर्मचारी आठवड्यातील तीन दिवस बुलढाणा तर तीन दिवस चिखली येथे सेवा देतात. अंगदुखी, ताप, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांनी तपासणी करून घेतली. त्यात संसर्ग झाल्याचे आढळून आले. सध्या त्यांच्यावर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत.

संपर्कातील १२ जण निगेटिव्हआरोग्य विभागाने खबरदारी म्हणून कोरोनाचा संसर्ग झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील १२ जणांचीही तपासणी केली आहे. मात्र, त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.

गर्दीत जाणे टाळा, मास्क वापरा...सध्याची कोविडची लक्षणे अत्यंत सौम्य आहेत. त्यामुळे जास्त घाबरून जाऊ नये, मात्र, खबरदारी घ्यावी, गर्दीत जाणे टाळावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स ठेवावा. शंका आल्यास तपासणी करून घ्यावी. - डॉ. अमोल राजपूत, आरोग्य अधिकारी चिखली उपजिल्हा रुग्णालय. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या