शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

राणीच्या बागेत अस्वल आले पण चिमुकलीच्या सतर्कतेने दुर्घटना टळली

By निलेश जोशी | Updated: May 9, 2023 15:07 IST

सुदैवाने यावेळी कुठलीही दुर्घटना घडली नाही.

बुलढाणा : शहरालगत मलकापूर मार्गावर किवा क्रीडा संकुलाकडे सकाळी किंवा सायंकाळी फिरण्यास जाणाऱ्यांना अस्वल आणि बिबट्याचे दर्शन ही अलिकडील काळातील नित्याचीच बाब बनली असली तरी आता अस्वलाने चक्क राणीच्या बागेत सोमवारी सायंकाळी विश्रांती घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यावेळी कुठलीही दुर्घटना घडली नाही.

समुद्र सपाटीपासून २ हजार १९० फूट उंच असलेले बुलढाणा शहर हे तिन्ही बाजूंनी जंगालने व्यापलेले आहे. पूर्वी जुन्या आरटीअेा कार्यालयासह अगदी रामगनररच्या भागत सुद्धा अस्वलाचे दर्शन यापूर्वी झालेले आहे. मात्र सिमेंटचे जंगल आता उभे रहाल्याने जंगलालगत मानवी वस्ती झाली आहे. त्यातूनच कधी कधी अस्वल, बिबट्या कधी कधी तडस बुलढाणा शहरात मानवी वस्तीलगत येत असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर राणीच्या बागेत एका अस्वलाने सोमवारी सायंकाळी प्रवेश केल्याचे समोर आले. 

संध्याकाळ असताना संगम तलावाच्या बाजूने तो राणीच्या बागेत शिरला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे. सायंकाळी राणीच्या बागेत काही पर्यटक व लहान मुले खेळत होती. तशी घरी जाण्याची वेळही झाली होती. त्यावेळी एका चिमुकल्या मुलीने राणीच्या बागीते संगम तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळच असलेल्या स्केटींगच्या जागेलगत बघीतले. ही बाब तीन त्वरित तेथे छायाचित्र काढणारे छायाचित्रकार सुभाष देशमुख यांना सांगितली. त्यांनीही घटनेचे गांभिर्य पहाता बागेतील लहान मुलांसह नागरिकांना परत जाण्याचा सल्ला देत सुरक्षा रक्षकास याची माहिती दिली. सुरक्षा रक्षकाने याची माहिती त्वरित रेस्क्यू टिमला दिली. मात्र तोवर बराच अंधार पडल्याने अस्वल नेमके कोठे गेले हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान प्रारंभी अस्वल बघितल्यानंतर सर्वांनी आरडाओरड केल्यामुळे अस्वल जिल्हा उपवन संरक्षकांच्या कार्यालयानजीकच्या पट्ट्यातून निघून गेले असावे असे सांगण्यात येत आहे. गस्त वाढवलीराणीच्या बागेत अस्वल आल्याची माहिती मिळाल्यानंतर आरएफअेा अभिजीत ठाकरे तसेच वनविभागाचे बचाव पथक तेथे दाखल झाले. परंतू अंधार पडल्यामुळे अस्वल नंतर दिसले नाही. काळजी करण्याचे कारण नसले तरी राणीच्या बागेत येणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी,असे आवाहनही वनविभागाच्या वतीने करण्यात आले. मंगळवारी पहाटे पर्यंत सतर्कतेचा इशारा वनविभागाने यापार्श्वभूमीवर दिला होता. मात्र आता परिस्थिती पूर्ववत असल्याचे ठाकरे म्हणाले. गेल्यावर्षीही १६ जून २०२२ रोजी अस्वल चक्क जिल्हा उपवनसंरक्षकांच्या बंगल्यापर्यंत पोहोचले होते. सोबतच जिल्हा उपवनसंरक्षक कार्यालय परिसरातच रेस्क्यू टिमचे वास्तव्य असते.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा