शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

९0 टक्के विद्यार्थी गणवेशापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 02:54 IST

बुलडाणा जिल्हा : झीरो बॅलन्स खाते उघडण्यास बँकांची टाळाटाळ

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी नव्वद टक्के गणवेश अनुदान पात्र विद्यार्थी गणवेशापासून वंचीत आहेत. दरम्यान, अनेक बँकांकडून ‘झिरो बॅलेन्स’वर खाते उघडण्यास टाळाटाळ होत असून यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या मोफत गणवेश पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी चारशे रुपये दिले जाणार आहेत़ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यात ९२ हजार ४६४ विद्यार्थिनी तर ५४ हजार १३४ विद्यार्थी संख्या आहे़ एकूण १ लाख ४६ हजार ५९८ विद्यार्थ्यांपैकी आजमितीला केवळ १० टक्के विद्यार्थ्यांनीच बँकेत खाते उघडले आहे. या योजनेअंतर्गंत जिल्ह्यातील १३ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ५ कोटी ८६ लाख ३९ हजार २०० रुपयाचा निधी लागणार आहे़ २०१७- १८ मध्ये मोफत गणवेश योजनेची तरतूद लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे़ बॅँकेत विद्यार्थ्यांची खाती उघडण्यासाठी होत असलेली गर्दी आणि काही राष्ट्रीयीकृत बँका झीरो बॅलन्स खाते उघडण्यास करीत असलेली टाळाटाळ यामुळे विद्यार्थी व पालकांची चांगलीच अडचण झाल्याचे चित्र आहे. बँकेत खाते काढण्याची अडचण काही दिवसांत दूर होईल. तरीही याबाबत काही समस्या असल्यास विद्यार्थ्यास धनादेशाव्दारे गणवेश अनुदान दिले जाईल़ - एन.के.देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुुलडाणा