शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

९0 टक्के शेतकर्‍यांनी भरले कर्जमाफीचे अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:20 IST

कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ४५७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. शासनाने अर्ज भरण्यासाठी गावोगावी केंद्र उभारल्याने आजपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार ५३४ शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज भरता आले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येणार्‍या अडचणींची शर्यत पार करून नोंदणीकृत शेतकर्‍यांपैकी ८९.३२ टक्के शेतकरी अर्ज भरण्यात यशस्वी झाले.  

ठळक मुद्दे३ लाख ८३ हजार शेतकर्‍यांनी केली होती नोंदणी३.४२ लाख शेतकर्‍यांनी भरले अर्ज विभागात बुलडाण्याचे सर्वाधिक अर्ज 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ४५७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. शासनाने अर्ज भरण्यासाठी गावोगावी केंद्र उभारल्याने आजपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार ५३४ शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज भरता आले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येणार्‍या अडचणींची शर्यत पार करून नोंदणीकृत शेतकर्‍यांपैकी ८९.३२ टक्के शेतकरी अर्ज भरण्यात यशस्वी झाले.  शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देताना खरे लाभार्थी यापासून वंचित राहू नये, एकाच शेतकर्‍यांकडून दोन वेळा अर्ज येऊ नये तसेच चुकीच्या लाभार्थींना या योजनेचा लाभ होऊ नये, यासाठी शासनाने कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन स्वीकारण्याची सुविधा निर्माण केली आहे. त्याकरिता गावोगावी संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची जबाबदारी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान म्हणजेच आय.टी. विभागावर आहे, तर ही माहिती पुरविण्याचे काम सहकार खात्यावर आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे कर्जमाफीचे काम सुलभ झाले; मात्र काही ठिकाणी विविध अडचणी आल्याने शेतकर्‍यांना अर्ज भरता आले नाहीत. कर्जमाफीचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे येत असून, शासन स्तरावरून ते दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अडचीणीनंतरही जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ४२ हजार ५३४ अर्ज भरण्यात आले आहेत.  कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ४५७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८९.३२ टक्के शेतकर्‍यांचे अर्ज भरण्यात आले आहेत.  १५ सप्टेंबर अर्ज भरण्याची शेवटची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ पाच दिवस अर्ज भरण्यासाठी उरले असून, या पाच दिवसांत आपला अर्ज भरला जावा, यासाठी शेतकरी सर्व कामे सोडून दिवस-रात्र अर्ज भरण्याच्या केंद्रावर बसत आहेत.  त्यामुळे संगणक परिचालकांनाही अडचणींची शर्यत पार करून कमी दिवसांत जास्त अर्ज भरावे लागणार आहेत.

अमरावती विभागात बुलडाण्याचे सर्वाधिक अर्ज अमरावती विभागामध्ये आजपर्यंत ११ लाख ३६ हजार ९९४ शेतकर्‍यांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३ लाख ४२ हजार ५३४ शेतकर्‍यांनी अर्ज भरले आहेत, तर अकोला जिल्ह्यात १ लाख ५४ हजार ६४८, वाशिम १ लाख ६१ हजार १३६, अमरावती १ लाख ९७ हजार २३८ व यवतमाळ जिल्ह्यात २ लाख ७९ हजार ४३८ शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरले आहेत.

अशा येताहेत अडचणीकर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज ज्या संकेतस्थळाच्या माध्यमातून भरायचे आहेत, ते संकेतस्थळसुद्धा अनेक वेळा हँग होत असून, लिंक मिळत नाही. अनेक शेतकर्‍यांकडे आधारकार्ड नाही, तर काही शेतकर्‍यांच्या आधारकार्डला मोबाइल नंबरची नोंद नसल्याने त्यांना ‘वन टाइम पासवर्ड’ मिळत नाही. अशा शेतकर्‍यांचे थम्ब इम्प्रेशन घेऊन हा अर्ज भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येत असली, तरी त्यांचे थम्ब  इम्प्रेशन जुळत नाहीत. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर अर्ज भरता आला तर भरलेल्या अर्जाची प्रतच मिळत नाही. सदर अडचणी दूर करण्यासाठी महसूल विभागाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत.