शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक करणारे ९ टिप्पर पकडले: १३ जणांना अटक

By संदीप वानखेडे | Updated: December 31, 2023 19:45 IST

चिंचखेड परिसरात महसुल आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई

अंढेरा : देऊळगाव राजा तालुक्यात सगळीकडेच अवैध रेती माफियांचा सुळसुळाट सुरू आहे. चिंचखेड परिसरात बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव व अंढेरा पाेलिसांनी संयुक्त कारवाई करीत ९ टिप्पर पकडले. पथकाने १३ जणांना अटक केली असून लाखाे रुपयांचा एवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

चिंचखेड परिसरात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक हाेत असल्याची माहिती महसूलच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, अंढेराचे ठाणेदार विकास पाटील, चिखलीचे तहसीलदार सुरेश कव्हळे, देऊळगाव राजाचे तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्या संयुक्त पथकाने ३० डिसेंबर रेाजी रात्री सुलतानपूर चिंचखेड परिसरात धाड टाकली. यावेळी पथकाला पाहताच ९ टिप्पर चालकांनी रेती उसाच्या शेतात रिकामी करून पळ काढला. पथकाने गामस्थांच्या मदतीने ९ ही टिप्पर जप्त केले आहे. यातील चार टिप्पर अंढेरा पोलिस स्टेशनला लावले असून जागेअभावी पाच टिप्पर देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला लावण्यात आले आहे. याप्रकरणी फिर्यादी परमेश्वर बुरकुल तलाठी चिंचखेड यांच्या फिर्यादीवरून अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे टिप्पर यांचे चालक व मालक यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हाे दाखल केला आहे. याप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

पथकात याचाही सहभागकारवाई करणाऱ्या पथकात मंडळ अधिकारी विजय हिरवे मेव्हणा राजा, परमेश्वर बुरकुल चिचखेड तलाठी, संजय हांडे मंडपगाव तलाठी, विलास नागरे मेव्हणा राजा तलाठी, विनोद डोईफोडे अंढेरा तलाठी, सुभाष वाकोडे पिंपळगाव बु. तलाठी, मधुकर आबाजी उदार सिनगाव जहाँगीर तलाठी, तसेच वाहन चालक नरेंद्र उबाळे व गजानन ताकतोडे यांचा समावेश हाेता.

यांच्याविरुद्ध झाला गुन्हा दाखलअंढेरा पाेलिसांनी अजय गजानन देशमाने, रा. चिखली, रामेश्वर साेळंकी, रा. चांधई, विजय संजय शिंगणे, रा. दे. मही, कैलास सखाराम पायघन, रा. गाेदरी, विशाल कैलास गरड, रा. खैरव, अक्षय अनिल देशमुख, रा. साखरखेर्डा, संदीप पंढरीनाथ चेके, रा. सुरा, गणेश बाबूराव साळवे, रा. दे. मही, मुकुंदा काशीनाथ वाडेकर, रा. सा. भाेई, ज्ञानेश्वर ऊर्फ परमेश्वर संताेष माने, रा. सा. भाेई, शेख युसूफ शेख गुलाब, रा. दुसरबीड, दीपक ज्ञानदेव माेगल, रा. चांगेफळ, सुनील सूर्यभान मकासर, रा. बायगाव यांच्यावर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव