बुलडाणा : रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी एकही लायक नाही नसल्याने नकाराधिकाराचा (नोटा) वापर जिल्ह्यातील नऊ हजार मतदारांनी केला. मागील लोकसभेच्या निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने प्रथमच इव्हीएम मशीनवर नोटाचे बटण दिले आहे. ज्याला एकही उमेदवार योग्य नसल्याने मतदान करायचे नाही, त्यांच्यासाठी नकाराधिकाराची ही व्यवस्था निवडणूक आयोगाने करून दिली. लोकसभेच्या निवडणुकीत सुमारे १0 हजार मतदारांनी या बटणाचा उपयोग करून उमेदवाराप्रति आपला नकार दर्शविला होता. यावेळीसुद्धा सात मतदारसंघांतील ९ हजार ४३ मतदारांनी नोटाचा वापर केला. मेहकर मतदारसंघात नोटाचा वापर करणारे मतदार आघाडीवर आहेत. येथे १६४६ मतदारांनी रिंगणात असलेल्या उमेदवारांना नाकारले. त्या पाठोपाठ मलकापूर मतदारसंघात १६४५ मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केला. सर्वांत कमी जळगाव जामोद मतदारसंघात ८६८ मतदारांनी उमेदवारांना नाकारले. चिखली म तदारसंघात १३२१ मतदारांनी, तर बुलडाणा मतदारसंघात १ हजार २१ मतदारांनी एकही उमेदवार लायक नसल्याचे दाखवून दिले. सिंदखेडराजा मतदारसंघात १२७९ मतदारांनी नोटाचे बटण दाबले. खामगाव मतदारसंघात १२६३ मतदारांना रिंगणात असलेल्या उमेदवारापैकी एकही उमेदवार लायक वाटला नाही. बुलडाणा १0२१चिखली १३२१मेहकर १६४६सिंदखेडराजा १२७९खामगाव १२६३मलकापूर १६४५जळगाव जा. ८६८
९ हजार मतदारांची पसंती ‘नोटा’
By admin | Updated: October 20, 2014 00:16 IST