शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

८६१ ग्रामपंचायतींची वसुली ठप्प!

By admin | Updated: December 4, 2015 02:46 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ८६१ ग्रामपंचायतींची कर वसुली थांबली आहे.

बुलडाणा: ग्रामपंचायतीची कर आकारणी नव्याने ठरविण्यासाठी उच्च न्यायालयाने घरपट्टी वसुलीला स्थगिती दिल्याने जिल्ह्यातील ८६१ ग्रामपंचायतींची कर वसुली थांबली आहे. न्यायालयाने एप्रिलमध्ये हा निर्णय देऊन आठ महिने उलटले तरीही राज्य शासनाने ठोस निर्णय न घेतल्यामुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्याने मूलभूत सुविधा आणि विकासकामे थांबली आहेत. शिवाय कर्मचार्‍यांचे पगारही थकले आहेत. ग्रामपंचायतींकडून क्षेत्रफळावर आधारित घरपट्टी वसुली केली जाते. त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांचा हवाला देत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियमातील नियम दोन व चार आणि पाच (अ) रद्दबातल केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींच्या मालमत्ता कर आकारणीत समानता व सुसूत्रता ठेवण्यासाठी शासनाने अभ्यास गट स्थापन केला आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामावर दहा पटीने जादा कर आकारणी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्याविरोधात ग्रामस्थांनी अनेक हरकती दाखल केल्या. एप्रिलमध्ये उच्च न्यायालयाने नवीन निर्णयानुसार घरपट्टी वसुलीवर बंदी घातली. त्याला ८ महिने होऊनही राज्य शासनाच्या अभ्यासगटाने अद्यापही ठोस करप्रणाली तयार केली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींची आर्थिक कोंडी झाली आहे.