शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८३ शाळा मुख्यध्यापकाविना!

By admin | Updated: January 13, 2017 19:10 IST

जिल्ह्यात मराठी व उर्दु माध्यमाच्या एकूण ८३ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा मुख्यध्यापकाविना सुरू आहेत. त्या ८३ शाळेतील मुख्यध्यापकांचा कारभार इतर शिक्षकांवर

- ब्रम्हानंद जाधव/ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 13 - जिल्ह्यात मराठी व उर्दु माध्यमाच्या एकूण ८३ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा मुख्यध्यापकाविना सुरू आहेत. त्या ८३ शाळेतील मुख्यध्यापकांचा कारभार इतर शिक्षकांवर देण्यात आला असून, मंजूर शिक्षकांपैकी ६.३० टक्के शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षणाबरोबरच मुख्यध्यापकांअभावी प्रशासकीय कामावरही परिणाम जाणवत आहे.

राज्यात लाखो डी.टी.एड् व बी.एड्. धारक रोजगाराच्या शोधात फिरत आहेत. तर दुसरीकडे अतिरिक्त शिक्षक असल्याच्या नावाखाली गेल्या सहा वर्षापासून शिक्षकांची पदभरती झाली नाही. त्यामुळे डी.टी.एड् व बी.एड्. पदवी घेऊन बाहेर पडणा-या सुशिक्षीत बेरोजगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.

शिक्षण क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात सर्व शिक्षा अभियानाकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मात्र, शिक्षकांचे रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे.
जिल्ह्यात एकूण २ हजार ३३२ शाळा आहेत. त्यामध्ये १ हजार ४४८ जिल्हा परिषद, १०७ नगर पालिका व ७७७ खाजगी शाळांचा समावेश आहे. यातील प्राथमिक व  उच्च प्राथमिक मराठी माध्यमांच्या शाळेवर मुख्यध्यापकांसह ६ हजार १८६
पदे मंजूर आहेत. परंतू त्यातील ६ हजार ५६७ पदे कार्यरत असून ३९० पदे रिक्त आहेत. त्यामध्ये मुख्यध्यापकांची ३८९ पदे मंजुर आहेत. परंतू ३२४ मुख्यध्यापक कार्यरत असून ६५ मुख्यध्यापकांची पदे रिक्त आहेत. उच्च प्राथमिक शिक्षकांची पदे १ हजार २९२ मंजूर असून १ हजार २०४ कार्यरत आहेत.
तर ८७ रिक्त आहेत. प्राथमिक शिक्षकांची ४ हजार ५१२ पदे मंजूर असून, ४ हजार २७४ कार्यरत व  २३८ रिक्त आहेत. जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळांवरील ६५ व उर्दु माध्यमांच्या शाळावरील १८ असे एकूण ८३ पदे रिक्त असल्याने त्या शाळेवरिल मुख्यध्यापकांचा कार्यभार इतर शिक्षकांवर सोपावण्यात आला आहे. शिक्षकांबरोबरच मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याने शाळांच्या प्रशासकीय कामांना खीळ बसत आहे.
 
अतिरिक्त शिक्षक असतानाही रिक्त पदे कायम
राज्यातील सर्व खासगी माध्यमिक शाळांची २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात आॅनलाइन संच मान्यता पूर्ण करण्यात आली होतीे. त्यानुसार राज्यात चार हजार ५३ शिक्षक अतिरिक्त दाखविण्यात आले होते. एकीकडे चार हजार ५३ शिक्षक अतिरिक्त झाले असले तरी वेगवेगळ्या जिल्ह्यात चार हजार ५७७ माध्यमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. राज्यात अतिरिक्त शिक्षक असतानाही रिक्त पदांचा प्रश्न मात्र, कायम आहे.
 
उर्दु माध्यमाचे १०८ पदे रिक्त
प्राथमिक व  उच्च प्राथमिक उर्दु  माध्यमांच्या शाळेवर मुख्यध्यापकांसह ७६९ पदे मंजूर आहेत. परंतू त्यातील ७३९ पदे कार्यरत असून १०८ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये मुख्यध्यापकांची ४७ पदे मंजुर आहेत. परंतू २९ मुख्यध्यापक कार्यरत असून १८ मुख्यध्यापकांची पदे रिक्त आहेत. उर्दु उच्च प्राथमिक शिक्षकांची पदे २०४ मंजूर असून १७५ कार्यरत आहेत. तर २९ रिक्त
आहेत. प्राथमिक शिक्षकांची ५१८ पदे मंजूर असून ४५७ कार्यरत व ६१ रिक्त आहेत.