शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

८0 हजार कुटुंबांच्या घेतल्या स्वच्छतेसाठी भेटी!

By admin | Updated: October 9, 2016 02:05 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ४८३ ग्रामपंचायतीमधील ७९,९३२ हजार कुटुंबांना गृहभेटी देण्यात आल्या.

खामगाव(जि. बुलडाणा), दि. 0८-स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी सुरू असून, २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यातील ८0 हजार कुटुंबांच्या गृहभेटी आटोपल्या आहेत. शौचालय बांधकामाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर आता उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्ह्यातील ४८३ ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद प्रशासन कामाला लागले आहे.स्वच्छ महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण या राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.) सन २0१६-१७ या वार्षिक कृती आराखड्यांतर्गत समाविष्ट ग्राम पंचायतीमधील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात व्यापक स्वरूपात गृहभेटी अभियान राबविण्यात आले. या कालावधीत जिल्ह्यातील ४८३ ग्रामपंचायतीमधील ७९,९३२ हजार कुटुंबांना गृहभेटी देण्यात आल्या. समु पदेशन करून शौचालय बांधकामासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्यात आले आहे. शौचालयाचे बांधकाम आणि वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे सुयोग्य व्यवस्थापन, महत्त्वाच्या वेळी साबणाने हात धुण्याचे महत्त्व तसेच उघड्यावरती शौचविधीचे लक्षण पुसून टाकण्यासाठी स्वच्छता संदेशातून माहिती देण्यात आली. गृहभेटी अभियानात बुलडाणा जिल्ह्यातील ८६४ ग्रामपंचायतींपैकी ४८३ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींच्या भेटी आटोपल्या असून, आता शौचालय बांधकाम वाढविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कामाला लागले आहे. स्वच्छ भारत मिशन यशस्वीतेसाठी गृहभेट अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गृहभेटीत अधिकारी, पदाधिका-यांचाही समावेश*स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) गृहभेट अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले आहे. शौचालय बांधकाम आणि वापरासाठी नागरिकांची मानसिक तयारी करण्यासाठी जि.प., पं.स. अधिकार्‍यांसह पदाधिकार्‍यांचाही समावेश महत्त्वाचा ठरला. *ज्या गावात १00 पेक्षा कमी शौचालय आहेत अशा गावामध्ये शौचालय बांधकाम वाढविण्यासाठी भर देण्यात येत आहे. गृहभेटीत पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी यासह शासकीय कर्मचार्‍यांचा समावेश होता.तालुकानिहाय ग्रा.पं. संख्या व उद्दिष्टपं.स.               ग्रा.पं.               उद्दिष्टबुलडाणा           ३३                   ७0६३चिखली             ४९                 ११९४९दे.राजा              २३                   ४0७८सिंदखेडराजा       ३७                  ४४९0लोणार               ३१                  ५५५८मेहकर               ४७                १0४९६खामगाव            ४७                  ६९२४शेगाव                ४७                  ६७७६संग्रामपूर           २३                  १६९४जळगाव जा.       ३0                 ५४९३नांदुरा                ३५                 ४६९0मलकापूर           ४९                 ४९३२मोताळा             ३२                 ५७८९