शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटीने खासगी डिझेल पंपांना दिले ८0 कोटी

By admin | Updated: September 6, 2014 01:14 IST

अनुदानीत इंधनाचा पुरवठा बंद; इंधनासाठी खासगी पंपांना सुमारे ८0 कोटी रुपये दिले

सिद्धार्थ आराख / बुलडाणाअनुदानीत इंधनाचा पुरवठा बंद झाल्यानंतर मागील २0 महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने खासगी पंपांना सुमारे ८0 कोटी रुपये दिले. जानेवारी २0१३ पासून राज्यभरातील एसटी महामंडळाच्या बसेसला खासगी पंपावरून इंधनाचा पुरवठा सुरू करण्यात आला होता. आता तो बंद करून एसटी महामंडळाचे स्वत:चे डिझेल पंप पुर्ववत सुरू केले असून जिल्ह्यातील सातही डेपोतील डिझेल पंप ५ सप्टेंबरपासून सुरू झाले आहेत.राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे, विद्युत महामंडळ व विविध खासगी कंपन्यांना पुरवठा करण्यात येणार्‍या इंधनाचे दर हे किरकोळ विक्री दरापेक्षा जास्त होते. आधीच एसटी महामंडळाला दिवसेंदिवस होणारा तोटा त्यात डिझेलच्या किंमतीमध्ये वारंवार होणारी वाढ यामुळे एसटीला बल्क रेटने डिझल विकत घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे जानेवारी २0१३ पासून एसटीचे डिझल पंप बंद करून खासगी पंपावरून डिझल पुरवठा सुरू करण्यात आला होता. बुलडाणा जिल्ह्यात एसटीचे सात डेपो आहेत. या सातही डेपोला त्या-त्या शहरातील खाजगी पंपवरून डिझेलचा पुरवठा सुरू करण्यात आला होता. महिण्याकाठी एसटीला जवळपास ४ कोटी रूपयाचे डिझेल लागत होते. म्हणजे मागील २0 महिण्यात एसटीने खासगी पंपांना ८0 कोटी रूपये दिले. आता डिझेलचे बल्करेट कमी झाल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने खाजगी पंपाचे डिझेल बंद करून पुन्हा स्वत:चे डिझेल पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला. बुलडाणा जिल्ह्यातील सातही पंप आजपासून सुरू झाले आहेत.वरिष्ठांच्या आलेल्या आदेशा नंतर एसटीच्या सातही आगारात बंद अवस्थेत असलेल्या डिझेल पंपची चाचणी घेण्यात आली व आजपासून खासगी डिझेल पंपावरून डिझल घेणे बंद करण्यात आले आहे. यापुढे प्रत्येक आगारत डिझेल उपलब्ध होणार असल्याचे विभाग नियंत्रक एन.एन.मैंदयांच्याकडून सांगण्यात आले. *प्रवाशांचा त्रास कमी झालाखासगी पंपावर इंधन भरण्यासाठी गेलेल्या बसेसला बरेच वेळा रांगेत उभे राहावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांनाही ताटकळत थांबावे लागायचे.काही पंपावर एसटीला चांगली सेवाही मिळत नव्हती. अनेक ठिकाणी पंपावर वाद सुध्दा व्हायचे. त्याचा त्रास प्रवाशांनाच सहन करावा लागत होता. आता एसटीचे स्वत:चे पंप सुरू झाल्याने प्रवाशांचा होणारा त्रास वाचणार आहे. *केपीटीएलवर पडला होता फरकखासगी डिझल पंपावरून डिझल घेणे सुरू झाले तेव्हापासून एसटी बसेसच्या केपीटीएलमध्ये (प्रति किलोमिटर अव्हरेज)फरक पडला होता.अशा तक्रारी अनेक वाहकांच्या होत्या. काही ठिकाणी डिझल पंप बसस्थानकापासून दुर होते त्यामुळे विनाकारण इंधन जास्त लागत होते.परिणामी केपीटीएल मध्ये फरक पडत होता, तर काही पंपावर डिझल भेसळीचाही प्रकार होत हाता.