शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षामुळे बुलडाणा जिल्ह्यात ७९१ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 15:04 IST

गत वर्षभरात जिल्ह्यात ७९३ बालकांचे मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: आर्थीक व दुर्बल घटकासह आदीवासी भागातील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले असतानाही गत वर्षभरात जिल्ह्यात ७९३ बालकांचे मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यामुळे योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर किती खर्च केल्या जातो हा संशोधनाचा विषय बनला आहे.जागतिक आरोग्य संस्थेच्या (डब्लू.एच.ओ) निर्देशानुसार संपूर्ण देशात गर्भवती महिला व नवजात शिशूंच्या आरोग्यासाठी विविध योजना कार्यान्वीत केल्या जातात. त्यावर युनिसेफ कडून कोट्यवधी रुपये निधी सुद्धा मिळतो. सध्या देशातील प्रत्येक गावात राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांकडे गर्भवती महिला, नवजात शिशूंच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्याची जबाबदारी असते. याशिवाय जिल्हा परिषदेचा महिला बालकल्याण विभागामार्फत सुद्धा महिलांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र कुठेतरी योजना राबविण्यात दिरंगाई होत असल्याने ऐन शेवटच्या क्षणी गर्भवती महिलेचा किंवा नवजात बालकाचा मृत्यू होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. मागील तीन वर्षात एकूण २ हजार ४०६ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आदीवासी भागातील कुपोषण मुक्तीचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत वेगवेगळ््या योजना राबविल्या जातात. याशिवाय आदिवासी विभागामार्फत सुद्धा कोटयावधी रुपये कुपोषणासह बालकांचा आरोग्याचा दर्जा सुधारल्या जावा यासाठी खर्च करते. असे असतानाही ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक असल्याचे दिसून येते. प्रसुतीसाठी मातेला रुग्णालयात आणताना माता व बालमृत्युचे प्रमाण सुद्धा तेवढेच गंभीर आहे. फक्त अहवालापुरतेच नवजात शिशूंंच्या मृत्यूचे प्रमाण उरले असल्याची शोकांतिका आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव