संग्रामपूर (बुलडाणा) : यंदाच्या पावसाच्या हुलकावणीमुळे सरासरीपेक्षा जळगाव जामोद उ पविभागात पर्जन्यमान कमी झाल्याची नोंद आहे. परिणामी भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होणार, त्यानुसार दोन्ही तालुक्यातील पंचायत समितीकडून संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. आ.डॉ.संजय कुटे यांनीही आढावा घेऊन आकडेवारी घे तली.जळगाव जामोद आणि संग्रामपूर या दोन तालुक्यात एकूण ७५ गावांमध्ये विविध उपाय योजना करण्याबाबत अहवालात नमूद आहे. पैकी जळगाव पंचायत समितीमधील ३५ गावे तर संग्रामपूर पंचायत समितीमधील ४0 गावांचा समावेश आहे. दोन्ही तालुक्यातील गावे खारपाणपट्टय़ात येत असल्याने पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी स्रोत मोजकेच आहेत. क्षारांचे प्रमाण पाहता र्मयादीत खोलीपर्यंतचे पाणी वापरात घेता येते. पाऊस पडल्यानंतर पाणी अडविण्याची सक्षम व्यवस्था या भागात नाही म्हणून उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न उद्भव त आहे. उन्हाळ्यात पाण्याची पातळी झपाट्याने खोल जाते. त्यामुळे गरजेनुसार पाणी पुरवठा होऊ शकत नाही. या बाबी लक्षात घेऊन पंचायत समितीच्या पाणीटंचाई कक्षाकडून नियोजन तयार करून प्रशासनाकडे सादर करण्यात आले. जळगाव जामोदमध्ये पाणीटंचाई भासणारे २१ गावे आहेत. ज्यामध्ये करणवाडी खु., करणवाडी बु., बोराळा बु., निंभोरा बु., गोळेगाव बु., गोळेगाव खु., सावरगाव, मडाखेड बु., वडशिंगी, बोराळा खु., चावरा, सुकळी, पिंप्री खोद्री, पळशी वैद्य, पळशी घाट, मोहिदेपूर, पळशी सुपो, नाव खुर्द, झाडेगाव, सुलज, काजेगाव आदींचा समावेश आहे. तर संग्रामपूरमध्ये ४0 गावांमध्ये ४0 उपाययोजना करण्याचा प्रस्ताव आहे. ज्यामध्ये सार्वजनिक विहिरीचे खोलीकरण (४), खासगी विहिरीचे अधिग्रहण (१६), नळयोजना विशेष दुरूस्ती (४), नवीन विंधन विहिरी करणे (१८) चा समावेश आहे.
७५ गावे पाणीटंचाईच्या उंबरठय़ावर
By admin | Updated: November 6, 2014 23:13 IST