शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

टॉवरच्या नावाखाली ७५ शेतकर्‍यांना गंडविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : साखरखेर्डा आणि देऊळगावराजा  परिसरातील शेतात मोबाइल टॉवर उभे करण्यासाठी  शेतकर्‍यांकडून स्टॅम्प पेपरवर जागा भाडेतत्त्वावर  लिहून घेऊन डिपॉझिटच्या नावाखाली एक लाखाहून  अधिक रक्कम हडप केल्याचा प्रकार उघडकीस  आला आहे. याप्रकरणी एजटांवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.साखरखेर्डा येथील केरोसीन डीलर अब्दुल रशिद  मो.हनिफ आणि देऊळगावराजा येथील संजय अन्ना ...

ठळक मुद्देतक्रार दाखलप्रत्येक शेतकर्‍याकडून घेतले एक ते दीड लाख डि पॉझिट साखरखेर्डा आणि देऊळगावराजा परिसरातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : साखरखेर्डा आणि देऊळगावराजा  परिसरातील शेतात मोबाइल टॉवर उभे करण्यासाठी  शेतकर्‍यांकडून स्टॅम्प पेपरवर जागा भाडेतत्त्वावर  लिहून घेऊन डिपॉझिटच्या नावाखाली एक लाखाहून  अधिक रक्कम हडप केल्याचा प्रकार उघडकीस  आला आहे. याप्रकरणी एजटांवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.साखरखेर्डा येथील केरोसीन डीलर अब्दुल रशिद  मो.हनिफ आणि देऊळगावराजा येथील संजय अन्ना  खंदारे या दोघांनी चेन्नई येथील टॉवर इस्टालर कं पनीशी संबंध असल्याचे शेतकर्‍यांना सांगितले.  ग्रामीण भागात ४ जी आणि ३ जी पीव्हीपी टॉवर उभे  करण्यासाठी एक हजार घनमीटरची जागा हवी  असल्याचे शेतकर्‍यांना सांगितले. जमिनीचा पॉइंट व्यवहार करताना ती गावाजवळ  असणे गरजेचे असून, जमीन भाड्याने देणार्‍या  व्यक्तीने डिपॉझिट म्हणून १ लाख ५0 हजार देणे  बंधनकारक असल्याचे सांगितले. त्या मोबदल्यात  टॉवर उभे राहिल्यानंतर जागा भाडे म्हणून २५ हजार  रुपये महिना आणि वॉचमनला १0 हजार रुपये  महिना, असे दोन वाचमन ठेवण्यात येईल, असा  बनाव करून १00 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी  लिहून देऊन त्या दोघांनी बुलडाणा जिल्ह्यातील ७५  शेतकर्‍यांसोबत आर्थिक व्यवहार केला. प्रत्येक शे तकर्‍याकडून १ लाख डिपॉझिट आणि इतर खर्च ५0  हजार रुपये, अशी रक्कम जानेवारी १६ मध्ये जमा  केली. सहा महिन्यांत टॉवर उभे झाले नाही, तर डि पॉझिटमधील एक लाख परत करण्याची हमी त्यांनी  स्टॅम्प पेपरवर लिहून दिली. यामध्ये काशीनाथ गारोळे  वरोडी, विजय उत्तमराव देशमुख पोफळ शिवणी,  शिवाजी रामभाऊ सानप पिंपरी खंदारे, विजय जनार्दन  बडे माळेगाव गौड, राहुल सदाशिव जगताप  आडगावराजा, मधुकर भिकनराव देशमुख पोफळ  शिवणी, विक्रम विजयराव देशमुख रा.कुट्टा ता.मानोरा  जि.वाशिम, रोशन प्रकाशराव देशमुख रा.चिखली  सरनाईक ता.रिसोड जि.वाशिम, बाबाराव  नीळकंठराव देशमुख रा.तरोडी ता.रिसोड यासह  साखरखेर्डा येथील तीन, चिखली येथील सेवानवृत्त  नायब तहसीलदार यांच्या १७ पॉइंट, पिंपळगावराजा  येथील एका व्यक्तीने १२ पॉइंट अशा प्रकारे ७५  व्यक्तींसोबत त्यांनी व्यवहार केला. आतापर्यंत २0  महिने होऊनही टॉवर उभे झाले नाही व डिपॉझिट परत  मिळाले नाही.त्यामुळे याबाबत साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये  अशोक देशमुख यांनी तक्रार दाखल केली आहे.  

या संपूर्ण व्यवहारात मी साक्षीदार असून, कंपनीचा  चालक, मालक कोण आहे, याचा थांगपत्ता नाही.  केवळ बनावट व्यवहार केल्याचे समजते. तरी  नागरिकांनी या व्यक्तीपासून सावध राहावे.-अशोक बाबाराव देशमुख, साखरखेर्डा.