शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी ७३ व्हेंटीलेटर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 10:41 IST

आरोग्य विभागाने सज्जता वाढवली असून वर्तमान स्थिती जिल्ह्यात ७३ व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात आले आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असून अवघ्या ३० दिवसात २७७ कोरोना बाधीत रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने सज्जता वाढवली असून वर्तमान स्थिती जिल्ह्यात ७३ व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात आले आहे.दरम्यान, टाटा ट्रस्टकडूनही दहा व्हेंटीलेटर जिल्ह्यास मिळणार असून तीन व्हेंटीलेटर प्राप्त झाले आहेत. उर्वरित सात यंत्रेही येत्या आठवड्यात जिल्ह्यास मिळणार आहे. जिथे कोरोना संसर्गाच्या प्रारंभी शासकीय रुग्णालयात अवघे तीन व्हेंटीलेटर होते. तेथे शासकीय यंत्रणेकडे ४६ व्हेंटीलेटर उपलब्ध झाले आहेत. खासगी डॉक्टरांकडे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या व्हेंटीलेटरपैकी २७ व्हेंटीलेटर हे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने सध्या जिल्ह्यात ७३ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत.टाटा ट्रस्टचे उर्वरित सात व्हेंटीलेटर येत्या आठवड्यात जिल्ह्यात येणार असून ते मिळाल्यानंतर तब्बल ८० व्हेंटीलेटर जिल्ह्यात उपलब्ध होतील. त्यामुळे कोरोना संसर्गाचा मृत्यूदरही नियंत्रणात आणण्यास अधिक मदत मिळेल. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर हा चार टक्के असून तो अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. त्याउपरही दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रयत्न होत आहे. ‘एम्स‘चे पथक करणार लवकरच पाहणीबुलडाणा जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रयोग शाळा मंजूर करण्यात आली असून त्यासंदर्भातील पाहणीसाठी एम्सचे एक पथक बुलडाण्यात येवून पाहणी करणार आहे. दरम्यान बुलडाण्यातील लॅब प्रत्यक्ष अस्तित्वात येण्यासाठी महिन्याभरापेक्षाही अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.जालन्याच्या लॅबचे काम अंतिम टप्प्यातजालना जिल्ह्याच्या लॅबचे कामही अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात ही लॅब कार्यान्वीत होण्याची शक्यता आहे. ही लॅब कार्यान्वीत झाल्यास बुलडाणा जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तेथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोराना चाचण्यांचे अहवाल लवकर मिळून रुग्णांवर उपाचार करणे सोपे होईल.

ट्रूनॅट मशीनचाही प्रस्तावकोरोनाच्या चाचण्या अधीक वेगाने होण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यासाठी ट्रूनॅट मशीनचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. ही मशीन उपलब्ध झाल्यास चाचण्यांचा वेग अधिक वाढले. या मशीनद्वारे एकाच वेळी चार नमुने तपासण्यात येतात. ते प्रयोग शाळेत पाठविण्याचे काम पडत नाही. आरोग्य विभागाने तसा प्रस्ताव तयार केला असून त्याची प्रशासकीय पातळीवर सध्या कार्यवाही सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा