शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी ७३ वीज चो-या पकडल्या!

By admin | Updated: July 2, 2016 01:02 IST

३४ पथकांकडून बुलडाणा, मलकापूर, मेहकर, खामगाव व शेगाव शहरांमध्ये कारवाई.

बुलडाणा : जिल्हाभरात वीज चोरीचे प्रमाण वाढले असून, यामुळे वज वितरण कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपनीने ७३ वीज चोरट्यांवर २९ जून रोजी एकाच दिवशी कारवाई केली. ही कारवाई पाच विभागात करण्यात आली असून, यात चोरट्यांकडून विद्युत मीटर जप्त करण्यात आले.बुलडाणा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्यावतीने अधीक्षक अभियंता जी. एम कडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात वीज चोरी विरोधात धडक मोहीम बुधवारी राबविण्यात आली. यामध्ये बुलडाणा, मलकापूर, मेहकर, खामगाव व शेगाव शहरांमध्ये ही मोहीम यशस्वीरीत्या राबविली. या मोहिमेत ३४ वीज चोरी पथके कार्यरत होती. तसेच १७९ कर्मचार्‍यांचा सहभाग होता. मोहिमेदरम्यान वीज कायदा कलम १३५ व १२६ अंतर्गत तब्बल ७९ वीज चोरी प्रकरणे पकडण्यात आली. त्यांच्याकडील वीज मीटर जप्त करण्यात आले आहे. मोहिमेंतर्गत बुलडाणा शहरामध्ये २0, मलकापूर २३, मेहकर १८, खामगाव सहा आणि शेगाव सहा, अशा वीज चोरी पकडण्यात आल्या. या मोहिमेमुळे वीज चोरी करणार्‍या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच या प्रकारची मोहीम यानंतर सुद्धा बर्‍याच ठिकाणी राबविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही वीज ग्राहकाने अवैधपणे वीज वापर करू नये, असे आवाहन वीज वितरण कंपनीकडून करण्यात आले आहे. पथकात १७९ कर्मचार्‍यांचा सहभागसकाळपासून जिल्ह्यातील पाचही शहरातील विविध भागात पथकांची विज मीटर तपासणी मोहीम सुरु झाली. यात जिल्हा विज वितरण कंपनी बुलडाणा विभागाचे कार्यकारी अभियंता झिजीलवार, खामगाव विभागाचे शिंदे, मलकापूर विभागाचे पवार व कार्यकारी अभियंता सोनकुसळे यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आली होती. यात विज वितरण कंपनीचे तांत्रिक कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी असे १७९ कर्मचारी सहभागी झाले होते. पथकांच्या कार्यवाही नंतर शहरांमधील विज चोरट्यांना धडकी भरली आहे.