शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विमा योजनेत ७ टक्केच महिला!

By admin | Updated: May 1, 2017 00:42 IST

बुलडाणा- ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील लोकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ४ हजार ५५१ लोकांनी आपला विमा काढला आहे.

२ लाख ४ हजार ५५२ लोकांनी उतरवला विमा

ब्रह्मानंद जाधव - बुलडाणाग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील लोकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ४ हजार ५५१ लोकांनी आपला विमा काढला आहे. यामध्ये १ लाख ९० हजार ८९८ पुरुष व १३ हजार ६५३ महिलांचा समावेश आहे. मात्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये महिलांचे प्रमाण केवळ सात टक्केच असल्याने विमा योजनेपासून महिला कोसोदूर असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठी केंद्र सरकारने आम आदमी विमा योजना, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्राच्यावतीने राबविण्यात येत आहे. १८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन कुटुंबातील रोजगार करणारा कुटुंब प्रमुख किंवा त्या कुटुंबातील एक प्रमुख कमावती व्यक्ती यांचा या योजनेंतर्गत भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून विमा उतरविला जातो. या विम्याची रक्कम केंद्र व राज्य शासनामार्फत प्रत्येकी १०० रुपये या प्रमाणे असे एकूण २०० रुपये प्रती लाभार्थी वार्षिक विमा हफ्त्यापोटी आयुर्विमा महामंडळाकडे भरणा करण्यात येते. या योजनेत लाभार्थींना विम्यासाठी कुठलीही रक्कम भरावी लागत नाही. विम्याच्या अंतिम मुदती पूर्वी सदस्याचा मृत्यू झाल्यास भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून त्याच्या वारसाला आश्वासित रक्कम ३० हजार रुपये दिले जातात. तसेच सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये किंवा अपघातामुळे कायमचे दिव्यांगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे व दोन्ही पाय निकामी झाल्यास ७५ हजार रुपये किंवा अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये रक्कम भरपाई म्हणून लाभार्थीला दिली जाते. जिल्ह्यात २ लाख ४ हजार ५५१ लोकांनी आपला विमा उतरविला आहे. यामध्ये १ लाख ९० हजार ८९८ पुरुष व १३ हजार ६५३ महिलांचा समावेश आहे. आम आदमी विमा योजनेचा लाभ घेण्यामध्ये महिलांचे प्रमाण केवळ सात टक्केच असल्याने विमा योजनेमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येतो. तालुकानिहाय आम आदमी विमा योजनेचे लाभार्थीबुलडाणा तालुक्यात १६ हजार ८५८ एकूण लाभार्थी असून, त्यात १ हजार ५८८ महिला व १५ हजार २७० पुरूष आहेत. चिखली तालुक्यात २४ हजार ८४४ एकूण लाभार्थी असून, ९५५ महिला व २३ हजार ८८९ पुरूष आहेत. देऊळगाव राजा तालुक्यात ९ हजार ९६५ पैकी ४३३ महिला व ९ हजार ५३२ पुरूष आहेत. जळगाव जा. १८ हजार ८७४ पैकी १०९४ महिला व १७ हजार ७८० पुरूष आहेत. खामगाव २२ हजार ३६८ पैकी १५२४ महिला व २० हजार ८४४ पुरूष आहेत. लोणार ११ हजार ५४२ पैकी ६८० महिला व १० हजार ८६२ पुरूष आहेत. मलकापूर १० हजार ६१३ पैकी ७८५ महिला व ९ हजार ८२८ पुरूष आहेत. मेहकर २४ हजार ६९९ पैकी २४७४ महिला व २२ हजार २२५ पुरूष आहेत. मोताळा १४ हजार ६१५ पैकी १०२० महिला व १३ हजार ५९५ पुरूष आहेत. नांदुरा तालुक्यात १४ हजार ७३८ पैकी ८५२ महिला व १३ हजार ८८६ पुरूष आहेत. संग्रामपूर १४ हजार ३९६ पैकी १२२२ महिला व १३ हजार १७४ पुरूष आहेत. शेगाव ७ हजार ७०९ पैकी ४०२ महिला व ७ हजार ३०७ पुरूष आहेत. सिंदखेड राजा तालुक्यात १३ हजार ३३० पैकी ६२४ महिला व १२ हजार ७०६ पुरूष आहेत.