शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

७० लाखांच्या कामावर सात कोटींची उधळपट्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:50 IST

७० लाखांच्या रस्त्यांवर सात कोटींचा खर्च करून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  नगर पालिकेच्या हद्दीतील भारत कटपीस ते फरशी रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि रूंदीकरणाचे काम गत दीड वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत सामान्य नागरिकांसह व्यापारीही वेठीस धरल्या जाते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात संताप व्यक्त होत आहे. त्याचवेळी ७० लाखांच्या रस्त्यांवर सात कोटींचा खर्च करून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. खामगाव नगर पालिका हद्दीतील भारत कटपीस ते फरशी रस्ता क्राँकीटीकरण आणि रूंदीकरणाचे काम जानेवारी २०१८ मध्ये सुरू झाले. मात्र, सुरूवातीपासूनच ढिसाळ नियोजन आणि कासवगतीमुळे रस्त्याचे काम चांगलेच रखडले. दरम्यान, भूमिगत केबल, पाणी पुरवठ्याची पाईपलाईन, बीएसएनएल कंपन्यांचे भूमिगत केबल यामुळे कामास विलंब झाला. त्यानंतर सुमारे २ महिने न्यायालयीन वादामुळे रस्त्याच्या कामास विलंब झाला. मात्र, त्यानंतर तब्बल २० महिने पूर्णत्वास गेल्यानंतरही रस्ता कामाने गती घेतलेली नाही. या रस्ताकामातंर्गत आॅक्टोबर २०१८ मध्ये पाणी पुरवठा पाईपलाईन वळविण्यासाठी कायार्देश देण्यात आला. मात्र, सुरूवातीपासूनच नियोजन शून्य कारभारामुळे या रस्ता कामास विलंब होत आहे. दर दोन-तीन  महिन्याच्या कालावधीनंतर कंत्राटदार काम सुरू करते. चार-पाच दिवस काम चालते. त्यानंतर पुन्हा काम खोळंबते. अनेक दिवस काम होत नसल्याने, खड्डे आणि मातीचे ढिगार तसेच पडून राहतात. सात कोटीच्या कामावर एकच क्राँकीट मिक्सर आणि चार पाच मजूर दिसतात. त्यामुळेही या कामास विलंब होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा आहे. भारत कटपीस ते महावीर चौक पर्यंत विद्युत केबल, पाईपलाईन आणि इतर कामे झाली आहेत. मात्र, कंत्राटदाराच्या अकार्यक्षमतेमुळेच काम रखडत असल्याचा आरोप होत आहे.भारत कटपीस ते फरशी रस्त्याचे काम अवघ्या ७० लाखांमध्ये पूर्णत्वास जावू शकते. मात्र, सत्ताधाºयांनी टोलसाठी रस्ता बांधकामाची रक्कम ७ कोटींवर नेली. या रस्त्याचा कंत्राट नाशिक येथील एका कंपनीला केवळ नावापुरता देण्यात आला. प्रत्यक्षात काम मात्र, सत्ताधारी नगरसेवक पुत्रच करीत आहे. सणासुदीच्या दिवसांतील त्रास टाळण्यासाठी जनेतेने आवाज, उठवावा, काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत राहील.- अर्चना टाले, गटनेत्या काँग्रेस, नगर परिषद, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा