शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

६५ स्वस्त धान्य दुकानदार धान्याच्या प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:16 IST

मेहकर: अन्नपुरवठा कार्यालयाच्या नियोजनाअभावी मेहकर  शासकीय गोडावून अंतर्गत येणार्‍या जवळपास ६५ दुकानदारांना  अद्यापही मालाचे वितरण बाकी आहे. त्यामुळे पोळा सण अवघ्या  दोन दिवसांवर तर महालक्ष्मी सण आठवडाभरावर आला असताना  या दोन्ही महत्त्वाच्या सणाला अनेक गोरगरिबांना स्वस्त धान्या पासून वंचित राहण्याची शक्यता आहे.  

ठळक मुद्देपोळा, महालक्ष्मी सणाला गोरगरिबांवर अन्नधान्यापासून वंचित  राहण्याची वेळद्वारपोच योजनेच्या गाड्या बंद!तहसील विभागाकडून दिशाभूल करणारे पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: अन्नपुरवठा कार्यालयाच्या नियोजनाअभावी मेहकर  शासकीय गोडावून अंतर्गत येणार्‍या जवळपास ६५ दुकानदारांना  अद्यापही मालाचे वितरण बाकी आहे. त्यामुळे पोळा सण अवघ्या  दोन दिवसांवर तर महालक्ष्मी सण आठवडाभरावर आला असताना  या दोन्ही महत्त्वाच्या सणाला अनेक गोरगरिबांना स्वस्त धान्या पासून वंचित राहण्याची शक्यता आहे.  शहरी तथा ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी, मजूर व  गोरगरीब नागरिकांसाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानामधून कमी  भावात गहू, तांदूळ, साखर आदी अन्नधान्य वाटप योजना सुरू  केलेली आहे.  सध्याची महागाई पाहता गरिबांसाठी स्वस्त धान्य  दुकानामधून मिळणारे हे अन्नधान्य  सणासुदीला वेळेवर मिळणे  फार महत्त्वाचे आहे. श्रावण महिन्यामध्ये हिंदू बांधवांचे नागपंचमी,  रक्षाबंधन, पोळा, महालक्ष्मी असे महत्त्वाचे सण येतात. दरम्यान,  नागपंचमी, रक्षाबंधन सणाला गोरगरिबांना स्वस्त धान्य माल  वेळेवर मिळालाच नाही. तसेच पोळा व महालक्ष्मी हे सण अवघ्या  काही दिवसांवर आले असतानाही मेहकर तालुक्यात अनेक गावा तील स्वस्त धान्य दुकानात माल अजूनही पोहचलाच नाही. मेहकर  येथील शासकीय धान्य गोदाम अंतर्गत जवळपास १३८ स्वस्त  धान्य दुकानदार आहेत. त्यापैकी १८ ऑगस्टच्या दुपारपर्यंत एकूण  ८३ दुकानदारांना मालाचे वितरण झालेले होते. त्यापैकी २५  दुकानदारांना मागील महिन्यात माल मिळाला नव्हता. त्या २५  दुकानदारांना या महिन्यात माल देण्यात आला आहे. तर या   महिन्यात  काही दुकानदारांना माल देण्यात आला असून, जवळ पास ६५ दुकानदारांना अद्याप स्वस्त धान्य मालाचे वितरण झालेले  नाही. सोमवारला पोळा सण असताना केवळ दोन दिवस बाकी  आहे. तर २७ ऑगस्ट ला महालक्ष्मी सण आहे. या सणाला  गोरगरीब अन्नधान्यापासून वंचित राहणार असल्याचे चित्र दिसत  आहे. 

द्वारपोच योजनेच्या गाड्या बंद!शासनाच्या द्वारपोच योजनेंतर्गत श्रीनाथ ट्रान्सपोर्टचे राजू गुप्ता  यांच्याकडे बुलडाणा जिल्हय़ाचे द्वारपोच योजनेचे कंत्राट आहे.  राजू गुप्ता यांनी मेहकर येथील विनोद मानधना यांना मेहकर  गोडाउनचा माल द्वारपोच देण्यासाठी वाहतूक प्रतिनिधी म्हणून  नोव्हेंबर २0१६ पासून नियुक्त केले होते. गेल्या दहा महिन्यापासून  वाहतूक प्रतिनिधी विनोद मानधना यांचे २५ लाख रुपये बिल राजू  गुप्ता यांच्याकडे थकीत असल्याने मानधना यांच्यावर उपासमारीची  वेळ आली असून, १ ऑगस्टपासून त्यांनी आपल्या गाड्या बंद  केल्या आहेत.  

तहसील विभागाकडून दिशाभूल करणारे पत्रमेहकर गोडावूनमधून द्वारपोच योजनेंतर्गत अन्नधान्याचे वितरण  करण्यासाठी बुलडाणा जिल्हय़ाचे शासकीय वाहतूक कंत्राटदार  राजू गुप्ता यांनी मेहकर गोडाउनला विनोद मानधना यांना वाहतूक  प्रतिनिधी म्हणून नेमले होते. त्यामुळे विनोद मानधना यांचा मेहकर  अन्नपुरवठा कार्यालय व तहसील विभागाशी काहीही संबंध नस ताना तहसील विभागाने विनोद मानधना यांना वाहतूक ठेकेदार या  मथळ्याखाली दिशाभूल करणारे पत्र दिले आहे. त्यामुळे जिल्हा  वाहतूक ठेकेदार, मेहकरचे अन्नपुरवठा कार्यालय तहसील विभाग,  मेहकर येथील शासकीय गोडाउन यांच्यामध्ये नियोजनाचा अभाव  असल्याचे दिसून येत आहे.

विनोद मानधना यांनी त्यांच्या गाड्या बंद केल्या असल्या तरीसुद्धा  गोरगरीब जनता अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी आमचे  प्रयत्न सुरू आहेत. सणासुदीला वेळेवर माल पोहचवून गरिबांना  त्याचा लाभ मिळेल. -ई.एफ.सैय्यद, अन्न पुरवठा अधिकारी, मेहकर.

जिल्हा वाहतूक कंत्राटदार राजू गुप्ता व मेहकरचे अन्नपुरवठा  अधिकारी यांनी माझे २५ लाख रुपये थकविल्याने माझ्यावर उ पासमारीची वेळ आली आहे.-विनोद मानधना, वाहतूक प्रतिनिधी, मेहकर.

तत्कालीन वाहतूक ठेकेदार विनोद मानधना यांच्याकडे आमच्या  तीन वाहनांचे १ लाख २0 हजार रुपये थकीत आहेत. मानधना  यांच्या नियोजनाअभावी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी मानधना  यांच्या तीन गाड्या बंद केल्या आहेत. मानधना हे तहसीलदार व  अन्नपुरवठा अधिकार्‍यांवर विनाकारण खापर फोडत आहेत. - शेख लाल कुरेशी, वाहन मालक, मेहकर.