शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर जाणार्‍या ६३ ‘लोटा’बहाद्दरांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:54 IST

मानोरा : जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात सहा गावांमध्ये उघड्यावर शौचास जाणार्‍या ६३ जणांविरूद्ध वाशिम जिल्हा परिषद, मानोरा पंचायत समिती आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. १२00 रुपये प्रतीव्यक्ती यानुसार ४१ हजार ३00 रुपये दंड वसूल करण्यात आला. यातील दोन व्यक्तींनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर मानोरा पोलिसांनी कारवाई केली. या मोहिमेमुळे स्वच्छता अभियानाची पायमल्ली करणार्‍यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्दे४१ हजार रुपये दंड वसूल उघड्यावर जाणार्‍यांसाठी नाकाबंदी

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात सहा गावांमध्ये उघड्यावर शौचास जाणार्‍या ६३ जणांविरूद्ध वाशिम जिल्हा परिषद, मानोरा पंचायत समिती आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. १२00 रुपये प्रतीव्यक्ती यानुसार ४१ हजार ३00 रुपये दंड वसूल करण्यात आला. यातील दोन व्यक्तींनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर मानोरा पोलिसांनी कारवाई केली. या मोहिमेमुळे स्वच्छता अभियानाची पायमल्ली करणार्‍यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संकल्प स्वच्छतेचा  स्वच्छ महाराष्ट्राचा  या अभियानांतर्गत  उघड्यावर हागणदारीस जाणार्‍यांची ग्रामपंचायत पोहरादेवी, उमरी खुर्द, वसंतनगर, माहूली या परिसरात नाकाबंदी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत पोहरादेवीचे सभागृहास तात्पुरत्या स्वरुपात जेलचे स्वरुप प्राप्त झाले होते. जिल्हा परिषद वाशिम व पंचायत समिती मानोरा  यांचेकडून १२ गाड्या पोलिस प्रशासनाच्या ताफ्यासह आजुबाजुच्या परिसरात पहाटे ४ वाजतापासून गस्त घालुन उघड्यावर शौचास जाणार्‍या लोकांना पकडून ग्रामपंचायत पोहरादेवी, कार्यालयात पोलिसांच्या स्वाधीन करीत होत्या. उघड्यावर शौचास जाणार्‍यांकडून  प्रशासनाकडून ६00  ते १२00 पर्यंत ऑन द स्पॉट दंड वसुल करण्यात आला. यात प्रामुख्याने ग्रामपंचायत पोहरादेवी अंतर्गत ३२, उमरी खुर्द अंतर्गत १८,  वसंतनगर ५,  माहूली ५, हातना २ ,वाईगौळ १ अशा स्वरुपात ६३ लोकांविरु ध्द  दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. एकुण ४१ हजार ३00 रुपये दंड वसुल करण्यात आला. ग्रा.पं.पोहरादेवी अंतर्गत २ लोकांनी दंड भरण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी पोलिस स्टेशन मानोरा येथे फौजदारी कार्यवाहीकरीता पत्र देण्यात आले. यात जिल्हा परिषद वाशिम प्रशासनाच्यावतीने इस्कापे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी  निलेश राठोड, कार्यकारी अभियंता ग्रा.पा.पुर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग कक्षाची चमु  आंबेकर, दुधाटे, श्रृंगारे, सावळकर, सरतापे, अफुने पंचायत समिती मानोरा प्रशासनाचेवतीने गोहाड ,गटविकास अधिकारी नायसे,  चव्हाण, भगत, बैलखेडकर, व्यवहारे, वाघमारे, चिंतावार, सर्व मिनी बिडीओ सर्व ग्रामसेवक बी.आर.सी.कक्ष मानोरा, पोलिस प्रशासनाचयवतीने मळघने ठाणेदार आपल्या ताफ्यासह सकाळी ४ ते ९.३0 वाजेपर्यंत पूर्णवेळ उपस्थित होते.

पाहुण्यांना कर पडली महागातप्रशासनाच्यावतीने  उघड्यावर शौचास जाणार्‍यांकडून दंड वसूल करण्याची कार्यवाही सुरु असताना २२ ऑगस्ट रोजी कर साजरी करण्याकरिता आलेल्या पाहुण्यांनाही महागात पडले.  पाहुणे उघड्यावर शौचास जाताना पकडल्या गेले. त्यामुळे पाहुणचारासह पाहुण्यांच्या दंडाची रक्कमही भरण्याची वेळ काही  लोकांवर आली.त्यामुळे कर चांगलीच महागात पडल्याची कुजबूज सर्वत्र ऐकावयास येत होती.