शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१८ सरपंच पदांसाठी ६२ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:28 IST

जळगाव जामोद: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर जळगाव जामोद तालुक्यातील १८ सरपंच पदासाठी ६२ उमेदवार रिंगणात आहे. वडगाव पाटण येथील सरपंच पदासाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने हे पद रिक्त राहणार आहे. १९ ग्रामपंचायतींच्या १४१ सदस्यांपैकी ७0 सदस्य अविरोध विजयी झाले असून, ९ सदस्यांच्या जागा रिक्त राहणार आहे. उर्वरित ६२ सदस्यांसाठी १२५ उमेदवार रिंगणात आहेत.

ठळक मुद्देएक सरपंच पद रिक्त सदस्य पदांच्या ७0 जागा अविरोध 

नानासाहेब कांडलकर। लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर जळगाव जामोद तालुक्यातील १८ सरपंच पदासाठी ६२ उमेदवार रिंगणात आहे. वडगाव पाटण येथील सरपंच पदासाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने हे पद रिक्त राहणार आहे. १९ ग्रामपंचायतींच्या १४१ सदस्यांपैकी ७0 सदस्य अविरोध विजयी झाले असून, ९ सदस्यांच्या जागा रिक्त राहणार आहे. उर्वरित ६२ सदस्यांसाठी १२५ उमेदवार रिंगणात आहेत.गोळेगाव बु. येथे सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर तीन सदस्य अविरोध विजयी झाले आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गाची एक जागा रिक्त राहणार असून, उर्वरित तीन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. गोळेगाव खुर्द येथे सरपंच पदासाठी दोन व पाच सदस्यांसाठी दहा उमेदवार रिंगणात आहेत. एका सदस्याची निवड अविरोध झाली असून, अनुसूचित जमातीची एक जागा रिक्त राहणार आहे. माहुली येथे सरपंच पदासाठी तीन व दोन सदस्यांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. येथील तीन सदस्य अविरोध झाले असून, अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गाच्या दोन जागा रिक्त राहणार आहे. खेर्डा खुर्द येथे सरपंच पदासाठी चार व सात सदस्य पदासाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. दोन सदस्य अविरोध विजयी झाले आहेत. वडगाव पाटण येथील सरपंच पद हे अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव होते. या पदासाठी एकही अर्ज न आल्याने हे पद रिक्त राहणार आहे. तर ६ सदस्यांच्या जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, तीन सदस्य अविरोध विजयी झाले आहेत. मडाखेड बु. येथे सरपंच पदासाठी ३ तर सहा सदस्य पदासाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. तीन सदस्य अविरोध विजयी झाले आहेत. निंभोरा बु. येथे सरपंच पदासाठी सर्वाधिक आठ उमेदवार रिंगणात आहेत. तर दोन सदस्यासाठी ४ जागांमध्ये लढत आहे. सहा सदस्य अविरोध निवडून आले असून, नामाप्र स्त्री प्रवर्गाची एक जागा रिक्त आहे. मडाखेड खुर्द येथे सरपंच पदासाठी दोघांमध्ये सरळ सामना आहे. तर सदस्य पदाच्या सर्व सातही जागा अविरोध विजयी झाल्या आहेत. पळसखेड येथेसुद्धा सरपंच पदासाठी दोघांमध्ये सरळ सामना असून, येथील सदस्यपदाची अनुसूचित जातीची एक जागा रिक्त असून, उर्वरित सर्व सहा जागा अविरोध झाल्या आहेत. गाडेगाव बु. येथे सरपंचासाठी दोन व तीन सदस्यासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत तर चार सदस्य अविरोध झाले आहेत. टाकळी पारसकर येथे सरपंचासाठी दोघांमध्ये सरळ सामना होणार आहे.

सरपंच पदाचे सरळ व बहुरंगी सामनेगोळेगाव बु., गोळेगाव खुर्द, मडाखेड खुर्द, पळसखेड, गाडेगाव बु., टाकळी पारस्कर, बोराळा बु. व बोराळा खुर्द या आठ गावांच्या सरपंच पदासाठी दोन उमेदवारांमध्ये सरळ सामना आहे तर सर्वाधिक आठ उमेदवार निंभोरा बु. येथे रिंगणात आहे. पळशी वैद्य, हिंगणे बाळापूर व सातळी या तीन गावांच्या सरपंचपदासाठी सहा- सहा उमेदवार रिंगणात आहे तर खेर्डा खुर्द व भेंडवळ खुर्द येथे चार-चार तर मांडवा, झाडेगाव, मडाखेड बु. व माहुली येथे सरपंचासाठी त्रिकोणी संघर्ष होणार आहे.