शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६0 हजार ग्राहक भरतात ऑनलाइन देयक!

By admin | Updated: September 14, 2016 00:59 IST

गो ग्रीन-गो डिजिटलकडे वाटचाल; महावितरणच्या उपक्रमाला बुलडाणा जिल्ह्यातील ग्राहकांचा प्रतिसाद.

गिरीश राऊतखामगाव(जि.बुलडाणा), दि. १३ : विविध क्षेत्रात अद्ययावतीकरणाचा वाढता प्रभाव असतानाच जिल्ह्यातील ६0 हजार ग्राहकदेखील वीज देयकाचा ऑनलाइन पद्धतीने भरणा करीत आहेत. यामुळे कागदासोबत श्रम व वेळेची बचत होत असून, महावितरणच्या गो ग्रीन-गो डिजिटल उपक्रमाला प्र ितसाद मिळत आहे. धकाधकीच्या आजच्या जीवनात पैशापेक्षाही वेळेला महत्त्व आले आहे; मात्र वैज्ञानिक प्रगती झाली असतानाही सर्वत्र रांगा दिसून येतात. रांगांमध्ये लागून आपले काम पूर्ण करुन घेण्यासाठी तासनतास लागतात. यामुळे वेळेचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी एटीएम, ऑनलाइन व्यवहाराची परिभाषा आज अनेकांना पटू लागली आहे. या अद्ययावतीकरणाची अंमलबजावणी करी त बुलडाणा जिल्ह्यातील ६0 हजार ग्राहकांकडून ऑनलाइन पद्धतीने वीज देयकाचा भरणा केला जा त आहे. वेळ नसल्याच्या कारणावरून अनेकांकडून वेळेवर वीज देयकाचा भरणा न झाल्याने नाइलाजाने दंड भरला जातो. तसेच दंड भरुनही देयक भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. हे टाळण्यासाठी ग्राहक ऑनलाइन देयक भरणा करण्याला प्राधान्य देत आहेत. आज घरोघरी अँन्ड्राईड मोबाइल आले आहेत. यामुळे हे सहज शक्य होत आहे, तर महावितरणनेसुद्धा अँन्ड्राईड मोबाइलची घरोघरी असलेली उपलब्धता पाहता कर्मचारी व ग्राहकांना जोडण्यासाठी २४ तास तत्पर सेवा देण्यासाठी पाच अँप्स तयार केले असून, यापैकी चार अँप्स हे कर्मचार्‍यांसाठी तर पाचवे ग्राहकांसाठी सुरू झाले आहे. यामुळे वीज देयक मोबाइलवर पाहता येत असल्याने शेवटच्या दिवशीपर्यंंत देयकाची प्रतीक्षा करावी न लागता ठरल्यावेळेवर वीज देयक मोबाइलवर पाहता येणार आहे, तर वीज देयकाचा भरणा क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बॅकिंगद्वारा होऊ लागला आहे. कागदनिर्मितीसाठी वृक्षतोड होऊन पर्यावरणाला हानी पोहोचते. हे टाळण्यासाठी महावितरणने गो ग्रीन-गो डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास प्रतिसाद देत ६0 हजार ग्राहक ऑनलाइन पद्धतीने देयकाचा भरणा करीत असल्याने दर महिन्याला साठ हजार कागदांचा वापर कमी होत आहे. यामुळे पर्यावरण वाचविण्यासाठी मदत होत आहे. भविष्यात डिजिटल बिलिंगमुळे ऑनलाइन पद्धतीने भरणा करणार्‍यांची संख्या आणखी वाढू शकते. त्यामुळे कागदासोबतच वेळ, श्रम व पैशांची बचत होण्यास मदत होणार आहे. गत ऑगस्ट महिन्यात या ६0 हजार ग्राहकांकडून ६ कोटी ३१ लाख ५0 हजार ३९0 रुपये देयकापोटी ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आले आहेत. ग्रामीण भागातूनही प्रतिसादअद्ययावतीकरणाच्या युगात संगणक साक्षरतेला महत्त्व आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ग्राहकसुद्धा संगणक साक्षर होत असल्याने ऑनलाइन देयकाचा भरणा करणार्‍यांची संख्या वाढती आहे. यामुळे वेळेअभावी देयक न भरल्या गेल्यास दंडाची रक्कमसुद्धा वाचत असल्याने ग्राहकांना सोयीचे होत आहे.-अँप्समुळे देयक वेळेवर मिळाले नाही,ही तक्रार दूर झाली आहे. ऑनलाइन भरणा केल्यास कागदासोबतच देयक देणे, देयक भरणे यासाठीचा वेळ वाचेल. तेव्हा ग्राहकांनी अद्ययावत पद्धतीचा अवलंब करावा.- अजय शिंदे, कार्यकारी अभियंता, वीज वितरण उपविभाग खामगाव.