शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्याच्या स्मशानभूमीत २० दिवसात ६० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:35 IST

प्रत्यक्ष स्मशानभूमीमध्ये आणलेल्या पार्थिवांच्या नाेंदी पाहता ही बाब स्पष्ट झाली आहे. या ६० मृत्यूंपैकी कोरोनामुळे नेमके किती मृत्यू झाले ...

प्रत्यक्ष स्मशानभूमीमध्ये आणलेल्या पार्थिवांच्या नाेंदी पाहता ही बाब स्पष्ट झाली आहे. या ६० मृत्यूंपैकी कोरोनामुळे नेमके किती मृत्यू झाले आहेत हे स्पष्ट होत नसले तरी बोथारोडवरील हिंदू स्मशानभूमीत जागा कमी पडत असल्याचे चित्र आहे. येथील स्मशानभूमीत पार्थिवाच्या दहनासाठी चार पिंजरे आहेत. मात्र त्या स्मशानभूमीतील मुख्य अंत्यविधीच्या जागेव्यतिरिक्त परिसरात लगतच जागोजागी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे स्पष्ट जाणवत आहे. बुधवारी प्रत्यक्ष स्मशानभूमीत पाहणी केली असता जवळपास सहा पार्थिंवार गेल्या २४ तासात अंत्यसंस्कार करण्याच आले असल्याचे स्पष्ट दिसत होते. तर दोन चिता अद्यापही जळत असल्याचे समोर आले. स्मशानभूमीमधील मृतांच्या नोंदणी बुकाची पाहणी केली असता त्यात १ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान ६० जणांवर अंत्यसंस्कार झाल्याच्या नोंदी समोर आल्या आहेत. त्यामुळे बुलडाण्याची एकंदरीत स्थिती आता बिकट होते की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. स्मशानभूमीतील मुख्य अंत्यसंस्काराच्या जागेवरील चार पिंजऱ्यांलगतच जेथे जागा मिळेल तेथे मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे स्पष्ट जाणवत होते.

--सहा दिवसात ४० मृत्यू--

बुलडाणा जिल्ह्यात कडक निर्बंध व रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर २१ एप्रिलपर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. १९ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनामुळे केवळ एकाचा मृत्यू झाला होता. हा अपवाद वगळता १४ एप्रिलपासून आजपर्यंत सातत्याने कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे.