शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ५ वे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन बुलडाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:33 IST

बुलडाणा : भारतीय विचार मंच व स्थानिक व्हीजन बुलडाणा एज्युकेशन अ‍ॅन्ड वेलफेअर सोसायटी व्दारा संचालित पंकज लध्दड इन्स्टीट्युट आॅफ टेक्नोलॉजी बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने वंदनीय राष्टÑसंत तुकडोजी महाराज ५ वे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन यावर्षी पंकज लध्दड इन्स्ट्यिुट आॅफ टेक्नॉलॉजीच्या सभागृहात २६ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये ठरविण्यात ...

बुलडाणा : भारतीय विचार मंच व स्थानिक व्हीजन बुलडाणा एज्युकेशन अ‍ॅन्ड वेलफेअर सोसायटी व्दारा संचालित पंकज लध्दड इन्स्टीट्युट आॅफ टेक्नोलॉजी बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने वंदनीय राष्टÑसंत तुकडोजी महाराज ५ वे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन यावर्षी पंकज लध्दड इन्स्ट्यिुट आॅफ टेक्नॉलॉजीच्या सभागृहात २६ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले. या बैठकीला संस्थेचे सहसचिव  रविंद्र लध्दड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.जावंधिया, भारतीय विचार मंचाचे विदर्भ प्रांत संयोजक डॉ.सुभाष लोहे, चित्तरंजन राठी, जयप्रकाश खोत, विजयराव जोशी, डॉ.संतोष सांगळे व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.आपल्या महाराष्टÑामध्ये अनेक संत होवून गेलेत त्यामुळे आपण महाराष्टÑाला संतांची भूमी म्हणतो. संतांनी आपल्या समाजाचे प्रबोधन करून याला सर्वदृष्ट्या सक्षम बनविण्याचे मोलाचे कार्य केलेले आहे. त्यांचे राष्टÑीय, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक महत्व समजावून घेण्यासाठी अशा साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. आजच्या समाजाच्या सर्वोत्थानासाठी आपणास हे संत साहित्य समजले पाहिजे व त्यांच्या समग्र विचारांचा अभ्यास करण्यात यावा या उदात्त हेतूने गत ४ वर्षापासून वंदनीय राष्टÑसंत तुकडोजी महाराज विदर्भस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत आहे. आतापर्यंत चंद्रपूर, गोदिंया, यवतमाळ अशा जिल्ह्यांना साहित्य संमेलनाचे यजमानपद भूषविण्याचा गौरव मिळाला. यंदा व्हीजन बुलडाणा एज्युकेशन अ‍ॅन्ड वेलफेअर सोसायटी बुलडाणाचे अध्यक्ष डॉ.दिपक लध्दड यांच्या पुढाकारोन हा सम्मान बुलडाणा जिल्ह्याला मिळाला आहे. या साहित्य संमेलनाला आशिष चौबिसा, अध्यक्ष खामगाव अर्बन को. बँक हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून लाभणार आहेत आणि बुलडाणावासी या साहित्य संमेलनाला उपस्थित राहून या संधीचे सोनं करतील असा विश्वास साहित्य संमेलनाचे संयोजक रविंद्र लध्दड यांनी व्यक्त केला. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यातून साहित्य संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद द्यावा, सअ‍े आवाहन संमेलनाचे संयोजक व भारतीय विचार मंचाचे बुलडाणा जिल्हा संयोजक प्रवीण चिंचोलकर यांनी केले आहे.