शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे ५६ हजार क्विंटल कच्चे बियाणे कमी मिळणार : आर. एस.मोराळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 15:19 IST

Agriculture Newsयंदा कच्चे बियाणे कमी मिळणार आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व महाबीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बीजोत्पादन कार्यक्रमाला काही प्रमाणात फटका बसला आहे. राज्यात बुलडाणा जिल्हा हा बीजोत्पादन कार्यक्रमात प्रथम क्रमांकावर आहे. त्यातच यावर्षी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या वाढलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. मोराळे यांच्याशी साधलेला संवाद.

यंदा अतिवृष्टीमुळे बीजोत्पादन कार्यक्रमास फटका बसला का?हो. यंदा जिल्ह्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमास काही प्रमाणात फटका बसला आहे. १ लाख ७४ हजार ८२५ क्विंटल बियाणे मिळविण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र अतिपावसामुळे यंदा १ लाख १८ हजार क्विंटलपर्यंत बियाणे मिळण्याची अपेक्षा आहे. संपामुळे बीजोत्पादन कार्यक्रमास फटका बसलेला नाही.

जिल्ह्यातील बीजोत्पादनाची क्षमता किती?

बुलडाणा जिल्ह्यात महाबीजअंतर्गत चिखली येथे ८० हजार क्विंटल, मलकापूर येथे २५ हजार क्विंटल, खामगाव येथे १० हजार क्विंटलपर्यंत कच्च्या बियाणांपासून गुणवत्तापूर्ण बियाणे बनविण्यात येते. यासोबतच बुलडाणा अर्बनच्या एका प्लांटमधून १५ हजार क्विंटलपर्यंत बियाणे उपलब्ध करण्याची क्षमता आहे.खरीप हंगामासाठीच बियाणे तयार होते का?नाही. बुलडाणा जिल्ह्यात खरीप व रब्बी हगामासाठी बियाणे बनविण्यात येते. खरिपासाठी १ लाख ७४ हजार ८२५ क्विंटल, तर रब्बीसाठी ५० हजार क्विंटल बियाणे बनविण्याचे यंदाचे उद्दिष्ट आहे.

भाजीपाला बियाणांबाबात नेमकी स्थिती काय?

जिल्ह्यात भाजीपाला बियाणेही महाबीजअंतर्गत तयार केले जाते. मात्र प्रामुख्याने आपल्याकडे संकरित भेंडी, दुधी भोपळा, शिरे दोडका व चोपडा दोडका याला प्राधान्य दिले जाते. भाजीपाल्याचे यंदा ६३ क्विंटलपर्यंत बीजोत्पादन घेतले जाणार आहे. कांद्याचेही बीजोत्पादन १७ हेक्टरपर्यंत केले जाते. प्रामुख्याने चिखली, देऊळगावराजा, मेहकर आणि सिंदखेडराजा या भागात कांद्याचे बियाणे घेतले जाते. १५० ते १७० क्विंटलपर्यंत हे बियाणे तयार होते.बीजोत्पादन कार्यक्रमात किती शेतकरी सहभागी आहेत?जिल्ह्यात सहा हजारांच्या आसपास शेतकरी बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी असून, त्यांना बाजारभावाच्या तुलनेत २५ टक्के अधिक दर आपल्याकडून दिला जोतो. जवळपास ५० ते ६० कोटींच्या घरात या बीजोत्पादनाच्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मोबदला मिळतो.

कोणत्या पिकाचे बीज बदलाचे प्रमाण कमी आहे?

जिल्ह्यात प्रामुख्याने हरभरा पिकाचे बीज बदलाचे प्रमाण कमी असून, ते २० टक्के आहे. रब्बी पिकांचे बीज बदलाचे प्रमाण जिल्ह्यातच तसे कमी आहे. २० ते २५ टक्क्यांच्या आसपास आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत