शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ५५४ उसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात अडकले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 18:17 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ५५४ उसतोड मजूर अडकले असून त्यांना स्वगृही आणण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

बुलडाणा: पश्चिम महाराष्ट्रासह नागपुर जिल्ह्यात मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील ५५४ उसतोड मजूर अडकले असून त्यांना स्वगृही आणण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भातील आदेशही जिल्हाधिकारी यांनी पारीत केले आहे.गेल्या दीड महिन्यापासून पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नागपूर जिल्ह्यात हे ५५४ मजूर अडकले असून लॉकडाउनमधील अटी काहीशा शिथील झाल्यानंतर आता मजुरांनाही स्वजिल्हा व स्वगृहाची ओढ लागली आहे. प्रामुख्याने २२ ते २७ एप्रिल दरम्यानच या उसतोड मजुरांना स्वगृही परत आणण्याबाबत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी अनुमती दिली होती. मात्र परराज्यातील मजुरांना त्यांच्या स्वजिल्ह्यात पाठविण्यासोबतच, नवोदय विद्यालयाचे चंबा येथे अडकलेले विद्यार्थी आणि कोटा येथील विद्यार्थ्यांना बुलडाण्यात परत आणण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्रातून नेमके किती उसतोड मजूर हे जिल्ह्यात परतले याची माहिती तहसिलदारांकडून अद्याप प्राप्त झालेली नाही. जळगाव जामोद तालुक्यातील तब्बल १९८ उसतोड मजूर हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात येत असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अडकून पडले आहेत तर नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात बाबदेव येथे असलेल्या व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्टवर सिंदखेड राजा तालुक्यातील चार आणि देऊळगाव राजा तालुक्यातील दोन असे सहा मजूर सध्या अडकून पडलेले आहेत.पुणे जिल्ह्यातील भारे तालुक्यात येत असलेल्या राजगड, कोल्हापुरातील हातगणंगलेमधील शरद सहकारी साखर कारखाना, सांगली जिल्हतील उदगीरी शुगर अ‍ॅन्ड पॉवर लि. आणि  कांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह. साखर कारखाना, कुडल, कागल तालुक्यातील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, सांगलीतील वाळवा तालुक्यातील राजाराम बापू पाटील सह. साखर कारखाना तथा दत्त इंड्या प्रा. लि. मिरज तसेच सातारा जिल्ह्यातील यशवंत मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात प्रामुख्याने हे उसतोड मजूर अडकून पडलेले आहेत. पाच टप्प्यात या उसतोड कामगारांना बुलडाणा जिल्ह्यात आणण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १०१, दुसºया टप्प्यात १९७, तिसºया टप्प्यात ५२, चौथ्या टप्प्यात सहा आणि पाचव्या टप्प्यात १९८ जणांना बुलडाणा जिल्ह्यात येण्याची परवानगी देण्यात आली असून यातील काहीजण स्वगृही परतत असल्याची माहिती आहे.

लोणार, जळगाव जामोदमधील ३५४ मजूरबुलडाणा जिल्ह्यातील ११ तालुक्यातील हे उसतोड कामगार असून लोणार तालुक्यातील १५६ तर जळगाव जामोद तालुक्यातील १९८ मजूर आहेत. मोताळा तालुक्यातील ५६, खामगावमधील ६६, बुलडाण्यातील २८, चिखली-१५, मेहकर ९ संग्रामपूर एक, सि. राजातील १४ मजुरांचा यात समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLabourकामगार