शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

५५ हजार १०८ विद्यार्थी परीक्षा न देताच हाेणार उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST

जानेफळ : शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षा ...

जानेफळ : शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षा न देताच पुढच्या वर्गात उडी घेतली आहे. मात्र, अभ्यासासाठी दिवस-रात्र एक केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तालुक्यातील ५५ हजार १०८ विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार आहेत.

मागील वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. मुलांना अभ्यासाची सवय राहिली नसल्याने व यंदादेखील प्रत्यक्ष जून महिन्यातसुद्धा शाळा सुरू होण्याचा मुहूर्त हुकणार असल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोनामुळे सर्वांत जास्त झळ शिक्षण क्षेत्राला बसली असून, गत १५ महिन्यांपासून प्राथमिक शिक्षण प्रत्यक्ष बंदच आहे. यामुळे मुलांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. तालुक्यातील एकूण १५ केंद्रांतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक मिळून एकूण २५१ शाळांपैकी ८९ खाजगी, १५१ जिल्हा परिषद शाळा, तर ११ नगर परिषद शाळांचा समावेश आहे.

शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खाजगी शाळेतील ३८ हजार ६७२, जिल्‍हा परिषद शाळांमधील १४ हजार ९५६, तसेच नगर परिषद शाळेतील १४८० विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहेत. यात दहावीच्या ५०२८, तर बारावीच्या २७७५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षा रद्दच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ मात्र, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कष्टाचे योग्य फळ मिळणार त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे़

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यात विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार असल्याने ते अभ्यास करणार नाहीत. रुग्ण कमी झाल्यावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायला हव्या होत्या.

राम शिंदे (पालक)

पालकांची चिंता वाढली

शाळा सलग बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय राहिली नसून अभ्यासाची गोडीसुद्धा कमी झाल्याने पालकांच्याही चिंतेत मोठी भर पडली आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाइल आल्याने गेम खेळणे व इतर प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे उशिरा का होईना सरकारने परीक्षा घ्यायला हवी होती. जेणेकरून परीक्षेच्या भीतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असता असे मत पालकांमधून व्यक्त होत आहे.