लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात शनिवारी तपासणीमध्ये कोरोनाचे ५५ रुग्ण आढळून आले. दरम्यान २४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार १४४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३ हजार ८९ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील सहा, खामगाव चार, शेगाव दोन, देऊळगाव राजा एक, चिखली तीन, मलकापूर एक, लोणार २८, जळगाव जामोद सहा आणि संग्रामपूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. दुसरीकडे मेहकर, नांदुरा आणि सिंदखेड राजा तालुक्यात तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण बाधित आढळून आला नाही.दरम्यान, शनिवारी २४ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यासोबतच आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ८१ हजार ६१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ८६ हजार ३४ कोरोना बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ५५ बाधित; २४ जणांची मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 11:53 IST