शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सुट्यांमुळे एसटीच्या ५२ फे-या रद्द!

By admin | Updated: March 13, 2017 02:31 IST

उत्पन्नावर परिणाम; सैलानी यात्रेसाठी अतिरिक्त फे-या.

खामगाव, दि. १२- होळी व धूलिवंदनानिमित्त दोन दिवस सलग सुट्या आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या खामगाव आगाराला एसटीच्या ५२ फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. तर रद्द करण्यात आलेल्या काही फेर्‍या सैलानी यात्रेकडे वळविण्यात आल्या. वाढती खासगी वाहतूक, या वाहतुकीच्या तुलनेत सेवा सुविधा पुरवण्यात कमी पडत असलेली एसटी सध्या तोट्यात चालत असतानाच अशा सणासुदीला प्रवासी संख्या रोडावल्याने एसटीला फेर्‍या रद्द करण्याची वेळ येत आहे. ११ मार्च रोजी चौथा शनिवार असल्यामुळे शासकीय कार्यालयाला सुट्या होत्या, त्यामुळे शनिवारी एसटी बसेसला प्रवासी मिळाले नाही. रविवार १२ मार्चला होळी व सोमवार १३ ला रंगपंचमी असल्यामुळे या दोन दिवसाच्या सुट्यामध्ये प्रवासी मिळणार नसल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या खामगाव आगाराने दोन दिवस काही फेर्‍या रद्द केल्या. यामध्ये १३ तारखेला २0 फेर्‍या तर रंगपंचमीच्या दिवशी १३ मार्चला ३२ अशा ५२ फेर्‍या रद्द केल्या. या फेर्‍याचे जवळपास १७ हजार कि.मी. रद्द करण्यात आले. या दोन दिवसात रद्द केलेल्या फेर्‍यामुळे खामगाव आगाराला हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी मात्र एसटीच्या अधिकार्‍यांनी काही बसेस इतर मार्गावर वळविल्या. सध्या सैलानी यात्रा सुरू आहे. त्यामुळे या होळीला उपस्थित राहण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर भाविक सैलानी येथे जातात.त्यामुळे दोन दिवस खामगाव डेपोच्या १८ बसेस सैलानी यात्रेसाठी सोडण्यात येणार आहेत. यामध्ये रविवारी ८ तर सोमवारी रंगपंचमीच्या दिवशी १0 बसेस सोडण्यात येणार आहेत. मलकापूर रेल्वे स्टेशनवरून येणार्‍या प्रवाशाची गर्दी लक्षात घेता काही बसेस मलकापूर येथून सैलानीसाठी तर काही चिखली बसस्थानकारून सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची रोडवलेली संख्या लक्षात घेता खामगाव आगाराकडून होळी व धूलिवंदनाला १७ हजार कि.मी.चे शेड्युल प्लॅन केले आहे. या शेड्युलचा वापर सैलानी यात्रेसाठी करून आगाराचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न आहे. -संतोष वनारेआगार व्यवस्थापक, खामगाव