शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीच्या पथकाने पकडले ५१ टमरेल बहाद्दर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:39 IST

खामगाव : जवळच असलेल्या ग्रामपंचायत शिरजगाव देशमुख व ग्रामपंचायत गोंधनापूर येथे गुडमॉर्निंग पथकाने छापा टाकत तब्बल ५१ जणांना पकडून समज देण्यात आली. 

ठळक मुद्देस्वच्छ महाराष्ट्र अभियानात पं.स.चाही सहभागसर्वांंना समज देऊन सोडून देण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जवळच असलेल्या ग्रामपंचायत शिरजगाव देशमुख व ग्रामपंचायत गोंधनापूर येथे गुडमॉर्निंग पथकाने छापा टाकत तब्बल ५१ जणांना पकडून समज देण्यात आली. शासनाच्यावतीने गाव हागणदारीमुक्तीवर मोठय़ा प्रमाणात जोर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने किशोर शिंदे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड, पिंपळगाव राजा व ग्रामीण पोलीस स्टेशन खामगावच्या सहकार्याने गुडमॉर्निंंग पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाच्यावतीने ग्रामीण भागात रोज धाडसत्र सुरू आहे. दरम्यान आज ३ ऑगस्ट २0१७ रोजी पथकाने ग्रामपंचायत शिरजगाव देशमुख येथे धाड टाकुन उघड्यावर शौचास जाणार्‍या १८ व ग्रामपंचायत गोंधनापूर येथे ३३ लोकांना पकडले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यावेळी धाड टाकुन पकडलेल्यांना ठाणेदार यांनी समज देवून किमान ५ दिवसात शौचालय बांधकाम करण्यास सांगितले. व यापुढे जो कोणी उघड्यावर शौचास जाइल त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची उपस्थितांना माहिती दिली.कारवाईसाठी आलेल्या पथकात जाधव, सहा. गट विकास अधिकारी, पंचायत समिती खामगाव, बोरसे, पोहेकॉ खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन व त्यांची टिम तसेच सोबतच गडाख विअपं., बाळासाहेब खरे विअआ, संजय पाटील ग्रा.से. अंभोरे, अहिरे, व बीआरसी टिम खामगाव तसेच सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.