शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीच्या उपचारासाठी निघालेल्या मदत फेरीला ५0  हजाराचे दातृत्व! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:00 IST

चिखली : अवघ्या तीन वष्रे वयाच्या चिमुकलीला ब्लड कॅन्सर  या जीवघेण्या आजारातून वाचविण्यासाठी शहरातील सुजाण  तरुणांनी पुढाकार घेत तिच्या उपचारासाठी मदत निधी  उभारण्यासाठी शहरातून काढलेल्या मदत फेरीला अवघ्या काही  क्षणातच तब्बल ५0 हजाराचे दातृत्व लाभल्याने  शहरवासीयांच्या संवेदना तसेच तरुणांमधील विधायक वृत्ती  जागृत असल्याचे आज पहावयास मिळाले.

ठळक मुद्देलोकमत प्रेरणावाट

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : अवघ्या तीन वष्रे वयाच्या चिमुकलीला ब्लड कॅन्सर  या जीवघेण्या आजारातून वाचविण्यासाठी शहरातील सुजाण  तरुणांनी पुढाकार घेत तिच्या उपचारासाठी मदत निधी  उभारण्यासाठी शहरातून काढलेल्या मदत फेरीला अवघ्या काही  क्षणातच तब्बल ५0 हजाराचे दातृत्व लाभल्याने  शहरवासीयांच्या संवेदना तसेच तरुणांमधील विधायक वृत्ती  जागृत असल्याचे आज पहावयास मिळाले.तालुक्यातील शेलोडी येथील ज्ञानेश्‍वर प्रकाश सपकाळ यांची  अवघ्या तीन वर्षांची मुलगी आराध्या हिला ब्लड कॅन्सरने ग्रासले  आहे. तिला या आजारातून उपचाराअंती वाचविणे शक्य आहे;  मात्र तिचे वडील ज्ञानेश्‍वर सपकाळ यांची घरची परिस्थिती अत्यंत  हालाखीची आहे. पुणे येथे एका कंपनीत रोजंदारीवर काम करून  ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. अशात आराध्याला  वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यांनी औरंगाबाद ये थील धूत हॉस्पिटलमध्ये आराध्याला उपचारार्थ दाखल केले  आहे. तिला या आजारातून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी  सुमारे सहा ते सात लाखांची आवश्यकता आहे. ही बाब शहरा तील तरूणांना समजताच त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेत स्व त:कडील काही रक्कम जमा करून शहरातील दानशूर  नागरीकांकडे मदतफेरीच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले.  यास शहरातील दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने या मदत रॅली तून ५0 हजाराचा निधी २८ सप्टेंबर रोजी जमा झाला आहे.  शहरातील बसस्थानक परिसर, डी.पी.रोड, बाजार गल्ली, बाबू  लॉज चौक परिसर, राजा टॉवर, चिंच परिसर, जयस्तंभ चौक,  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर आदी भागांतून ही रॅली  काढण्यात आली होती. यामध्ये गजानन तारू, पवन गवारे, तुषार  भावसार, चंद्रकांत जेठे, भगवान पिटकर, कैलास हळकुटे,  विलास चव्हाण, नीलेश चांदोरे, मुकेश पडघान, भारत सापते,  गणेश थोरवे, संतोष तारू, भारत मुलचंदानी, अजय खरपास,  मिलिंद डोंगरदिवे, पवन महाडीक, सोनु सुडकर, धनंजय राजपू त, सुशील ठेंग, सागर खलसे, शुभम पडघान, अमित कोटवे,  जय मोरे, शेखर देशमुख, शुभम पाटील, गोपाल तावेड, प्रिन्स  जैस्वाल, सनी जाधव आदींसह मित्रमंडळींचा समावेश होता.